18 November 2024 3:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
x

Vodafone Idea Share Price | काही आयडिया? 8 रुपयांवर आलेल्या व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये तेजी, 5 दिवसात 13 टक्के परतावा दिला

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | एकेकाळी भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी म्हणून नावाजलेल्या व्होडाफोन आयडिया कंपनी शेअर्स आता मंदीच्या गर्तेतून बाहेर येताना दिसत आहेत. मागील सहा महिन्यांत व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरने लोकांना 29 टक्के नफा कमावून दिला आहे. एकेकाळी व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 118 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र नंतर कंपनीचे दिवस बदलले आणि शेअरची किंमत अक्षरशः 3.30 रुपये किमतीवर आली होती.

सध्या शेअरची किंमत

व्होडाफोन आयडिया या दोन्ही कंपनी नंतर एकत्र आल्या, पूर्वी ही कंपनी फक्त आयडिया नावाने सूचीबद्ध होती. 10 एप्रिल 2015 रोजी या कंपनीचे शेअर्स 118.41 रुपयेवर ट्रेड करत होते. तर 6 मार्च 2020 रोजी हा स्टॉक 3.30 रुपये किमतीवर आला होता. शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 8.81 टक्के वाढीसह 8.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील 5 दिवसात शेअरने 13 टक्के परतावा दिला

मागील 5 दिवसांत व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरची किंमत 13 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. शुक्रवारी सुरुवातीच्या काही तासात हा स्टॉक 10 टक्क्यांच्या वाढीसह 8.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मने व्होडाफोन आयडिया कंपनीच्या स्टॉकवर ‘न्यूट्रल’ रेटिंग देऊन तटस्थ भावना व्यक्त केल्या आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 7.5 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

सध्या व्होडाफोन आयडिया या कंपनीवर अफाट कर्जाचा डोंगर तयार झाला आहे. आणि सप्टेंबर 2023 पर्यंत कंपनीला 2,400 कोटी रुपये थकबाकी भरायची आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीने 2022-23 च्या मार्च तिमाहीसाठी परवाना शुल्क आणि स्पेक्ट्रम वापर शुल्क म्हणून 450 कोटी रुपये थकबाकी पेमेंट मंजूर केले आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीला जुलै 2023 पर्यंत 770 कोटी रुपये परवाना शुल्क म्हणून देणे होते.

मागील वर्षीच्या लिलावात खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमचा पहिला हप्ता म्हणून कंपनीला 1,680 कोटी रुपये देणे होते. हे देणे देण्यासाठी कंपनीने 30 दिवसांची अतिरीक्त मुदत वाढवून मागितली आहे. व्होडाफोन आयडिया कंपनी सप्टेंबर 2023 पर्यंत परवाना शुल्क भरण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. नियमाप्रमाणे जर स्पेक्ट्रम हप्त्याचे पेमेंट करण्यास उशीर झाला तर शिल्लक रकमेवर वार्षिक 15 टक्के व्याज आकारला जातो. म्हणून कंपनी कोणत्याही परिस्थितीत वेळेपूर्वी हे पेमेंट करण्यासाठी धडपड करत आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनीला स्पेक्ट्रम हप्त्यासाठी 1,700 कोटी रुपये देणे आहे. आणि यासह कंपनीला व्याजासह आकरलेली परवाना शुल्काची रक्कम 710 कोटी रुपये आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत व्होडाफोन आयडिया कंपनीला 2,400 कोटी रुपयेची थकबाकी भरणे आवश्यक आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीवर अनेक संकट घोंगावत आहेत. त्यातील एक म्हणजे कमी होत जाणारे ग्राहक प्रमाण. TRAI ने आपल्या मासिक अहवालात कळवले होते, “देशातील मोबाईल ग्राहकांची संख्या दर महिन्याला 0.11 टक्क्यांनी वाढते. मे महिन्यात मोबाईल ग्राहकांची संख्या 117.26 कोटीवरून वाढून जून 2023 मध्ये 117.39 कोटीवर पोहोचली होती.

सार्वजनिक क्षेत्रातील BSNL, MTNL आणि खाजगी कंपनी Vodafone Idea कंपनीच्या ग्राहकांची कमी होणाऱ्या संख्येमुळे या कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. नुकताच आलेल्या लेटेस्ट आकडेवारीनुसार 18.7 लाख ग्राहकांनी बीएसएनएल कंपनीची सेवा सोडली आहे. आणि 12.8 लक्ष ग्राहकांनी व्होडाफोन आयडिया कंपनीची सेवा सोडली आहे. आणि 1.53 लक्ष ग्राहकांनी एमटीएनएल कंपनीची सेवा सोडली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price today on 26 August 2023.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(121)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x