30 June 2024 6:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 01 जुलै 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या New Bikes 2024 | खुशखबर! पहिल्या CNG बाईक'सह 'या' 4 नव्या बाईक्स लाँचसाठी सज्ज, तारीख आणि फीचर्स नोट करा Numerology Horoscope | 01 जुलै 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Smart Investment | पगारदारांनो! या सरकारी योजनेतून तुमची पत्नी 5 लाखांपेक्षा जास्त कमाई करू शकते, संधी सोडू नका Home Loan EMI | तुम्ही गृह कर्जाच्या EMI ने कंटाळला आहात? असा कमी करा EMI चा भार 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी खुशखबर! प्रलंबित 18 महिन्यांचा DA एरियर मिळणार IRCTC Railway Ticket | यात्री कृपया ध्यान दें! जनरल तिकिट आणि स्लीपर कोच संदर्भात रेल्वेने नियम बदलला, प्रवाशांना फायदा
x

Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकची रेटिंग अपग्रेड, शॉर्ट टर्म मध्ये होणार मोठी कमाई, या प्राईसला स्पर्श करणार

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून तेजीत धावत आहेत. सध्या भारतीय शेअर बाजारात स्टॉक स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी पहायला मिळत आहेत. अनेक ब्रोकरेज हाऊसेस शेअर्सची री-रेटिंग करत आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ॲम्बिट कॅपिटलने व्होडाफोन आयडिया शेअर्सची रेटिंग अपग्रेड केली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

ब्रोकरेज फर्मला अपेक्षा आहे की, व्होडाफोन आयडिया कंपनी आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत ग्राहकांच्या घटत्या संख्येला अटकाव करण्यात यशस्वी होईल, त्यानंतर कंपनीच्या व्यवसायात सर्वांगीण वाढ पाहायला मिळेल. ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन 21 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनीने आपल्या कर्जात लक्षणीय घट केली आहे. आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 1.05 टक्के वाढीसह 18.21 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. नुकताच व्होडाफोन आयडिया कंपनीने नोकिया सोल्यूशन्स आणि नेटवर्क्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि एरिक्सन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना 2,458 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स वाटप करून कर्ज कमी करण्याची घोषणा केली होती.

एप्रिल 2024 मध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीने भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा फॉलो-ऑन-ऑफर यशस्वी करून दाखवला होता. या FPO च्या माध्यमातून व्होडाफोन आयडिया कंपनीने 18,000 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. FPO मधून जमा झालेली रक्कम कंपनीने 5G रोलआउटला गती देण्यासाठी खर्च केली आहे. उच्च दर्जाचे 4G आणि 5G नेटवर्क तयार करण्यासाठी व्होडाफोन आयडिया कंपनीला कॅपेक्स वाढवावे लागणार आहे.

व्होडाफोन आयडिया या कंपनीचे शेअर्स BSE 200 निर्देशांकात सामील आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 13 टक्के वाढली आहे. तर मागील तीन महिन्यांत व्होडाफोन आयडिया स्टॉक 28 टक्के मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 129 टक्के नफा कमावून दिला आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,16,751.68 कोटी रुपये आहे. मार्च 2024 तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीला 6,418.9 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. मागील वर्षी याच तिमाही काळात व्होडाफोन आयडिया कंपनीला 6563.10 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 27 June 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x