8 January 2025 1:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | ही कंपनी 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स देणार, खरेदीला गर्दी, यापूर्वी 4000% परतावा दिला - NSE: JINDWORLD FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: YESBANK Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, या फंडात मल्टिबॅगर परतावा मिळेल, 130 टक्क्याने कमाई करा SBI Mutual Fund | बिनधास्त महिना बचत करा SBI फंडाच्या या योजनेत, SIP वर मिळेल 1 कोटी 22 लाख रुपये परतावा EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
x

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | मंगळवार, 07 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात मजबूत खरेदीदारी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. स्टॉक मार्केट सेन्सेक्स २५० अंकांनी वधारून ७८,२११ च्या जवळपास पोहोचला होता. तसेच शेअर बाजार एनएसई निफ्टी 100 अंकांनी वधारून 23,720 वर पोहोचला होता. दरम्यान, व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.

व्होडाफोन आयडिया शेअरची सध्याची स्थिती

सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर 2.28 टक्क्यांनी वाढून 8.06 रुपयांवर पोहोचला होता. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 19.18 रुपये होता आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 6.61 रुपये होता. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 56,039 कोटी रुपये आहे.

व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचा निर्णय

कर्जबाजारी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये मंगळवारी फोकसमध्ये आला होता. व्होडाफोन आयडिया कंपनीने फायरफ्लाय नेटवर्क्स लिमिटेड कंपनीमधील आपली संपूर्ण ५० टक्के हिस्सेदारी आयबस नेटवर्क अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ४.५ कोटी रुपयांना विकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या करारानुसार ३० दिवसांच्या आत व्होडाफोन आयडिया कंपनी भारती एअरटेल लिमिटेड कंपनीसोबतच्या संयुक्त उपक्रमातून बाहेर पडणार आहे.

भारती एअरटेल लिमिटेड कंपनीने सोमवारी फायरफ्लाय नेटवर्क्स लिमिटेड कंपनीमधील आपली ५० टक्के हिस्सेदारी आयबस नेटवर्क अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकण्याचा निर्णय जाहीर केला होता.

व्होडाफोन आयडिया शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरने 1.26% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात व्होडाफोन आयडिया कंपनी शेअर 0.49% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 51.39% घसरला आहे. मागील १ वर्षात व्होडाफोन आयडिया शेअर 53.06% घसरला आहे. मागील ५ वर्षात व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरने 31.97% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरने 1.26% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price Tuesday 07 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x