21 January 2025 3:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN SIP Investment | पगारदारांनो, SIP गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याचा 'हा' फॉर्म्युला माहित आहे का, 5 कोटी रुपये परतावा मिळेल IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरबाबत चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर फोकसमध्ये आला - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA
x

Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर प्रचंड चर्चेत आहे. एकीकडे केंद्र सरकारने टेलिकॉम कंपन्यांच्या संदर्भात केलेल्या घोषणेमुळे शेअर्समध्ये मजबूत तेजी आहे. आता कंपनीबाबत दुसरी आनंदाची बातमी आली आहे.

कंपनीबाबत सुप्रीम कोर्टातून महत्वाची अपडेट

सोमवारी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीबाबत सुप्रीम कोर्टातून महत्वाची अपडेट मिळाले आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीला १६०० कोटींचा परतावा देणारा मुंबई हायकोर्टाचा नोव्हेंबर २०२३ पासूनचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. सुप्रीम कोर्टाने सोमवारी आयकर विभागाचा निर्णय रद्द बातल ठरवला. विशेष म्हणजे कर विभागाने यापूर्वीच व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीला पैसे परत केले होते.

सुप्रीम कोर्टाने देखील आयकर विभागाची अपील फेटाळताना विलंब केल्याबद्दल आयकर विभागावर ताशेरे ओढले आहेत. या विषयाला अनुसरून याचिकाकर्त्याचा २९५ दिवसांचा विलंब समाधानकारक नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. दुसरीकडे, व्होडाफोन आयडिया लिमिटेड सारख्या टेलिकॉम कंपन्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे केंद्र सरकार थकीत एजीआर माफ करण्याच्या विचारात करत आहे. तसे झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा व्होडाफोन आयडिया कंपनीला होणार आहे.

व्होडाफोन आयडिया शेअरची सध्याची स्थिती

मंगळवार, 21 जानेवारी 2025 रोजी व्होडाफोन आयडिया शेअर 5.53 टक्क्यांनी घसरून 9.39 रुपयांवर पोहोचला होता. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांचा उच्चांकी पातळी 19.18 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांचा उच्चांकी नीचांकी पातळी 6.61 रुपये होती. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 65,518 कोटी रुपये आहे.

व्होडाफोन आयडिया शेअरने 5 दिवसात 35% परतावा दिला

सोमवारी व्होडाफोन आयडिया शेअर सलग पाच दिवस तेजीत होता. सोमवारी शेअरने अप्पर सर्किट हिट करत १४.९१ टक्क्यांची वाढ नोंदवली होती. गेल्या 5 दिवसांत व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समने गुंतवणूकदारांना 35.40 टक्के परतावा दिला आहे. तसेच मागील १ महिन्यात या शेअरने 26.77% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price Tuesday 21 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x