20 April 2025 3:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON
x

Stock To Buy | हा शेअर फोकसमध्ये, स्टॉक देणार 45 टक्के वाढ, तज्ज्ञांकडून स्टॉक खरेदीचा सल्ला

Stock To Buy

Stock To Buy | VRL Logistics या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसात कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी आपल्या अहवालात मत व्यक्त केले आहे की, वाढीव लॉजिस्टिक क्रियाकलाप, मजबूत उद्योग दृष्टीकोन, चांगले मार्जिन आणि नफा आणि महसूल वाढीमुळे VRL लॉजिस्टिक कंपनीचे शेअर्स पुढील काळात नवीन उच्चांक स्पर्श करू शकतात. व्हीआरएल लॉजिस्टिक्स कंपनीचे शेअर पुढील काळात 800 रुपये किंमत ओलांडू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

कंपनीची कामगिरी :
20 जुलै 2022 रोजी VRL लॉजिस्टिक कंपनीचे शेअर्स 719 रुपये या विक्रमी उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. मात्र या लॉजिस्टिक कंपनीचे शेअर्स ही तेजी जास्त काळ टिकवून ठेवू शकले नाही.VRL लॉजिस्टिक कंपनीच्या शेअर्सला 550 रुपये किंमत पातळीवर मजबूत सपोर्ट मिळाला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 11 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/BSE निर्देशांकावर 587.85 रुपयांवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स मागील काही काळापासून मर्यादित श्रेणीत आहेत, परंतु मूलभूत गोष्टींमध्ये सुधारणा केल्यास कंपनीचे शेअर्स तेजीत येऊ शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

पुढील लक्ष किंमत अंदाज :
VRL लॉजिस्टिक कंपनीच्या शेअर्सबद्दल स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे की, दीर्घकालीन गुंतवणूकदार सध्याच्या किंमत पातळीवर किंवा घसरण झाल्यास कंपनीचे शेअर्स बिनधास्त खरेदी करू शकतात. पुढील एका वर्षात ही कंपनी 860 रुपये किमती पर्यंत वाढू शकते. म्हणजेच, सध्याच्या किंमत पातळीवरून VRL लॉजिस्टिक कंपनीचे शेअर्स 45 टक्के मजबूत होऊ शकतात. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत लॉजिस्टिक क्रियाकलापांनी अधिक वेग पकडला आहे, असे निरक्षण तज्ञांनी नोंदवले आहे. सप्टेंबर 2022 या कालावधीत ई-वे बिल निर्मितीने 84 दशलक्षांचा निव्वळ विक्रीमधील विक्रमी उच्चांक स्पर्श केला आहे.

अंतिम वापरकर्त्यांकडून कमालीची मागणी वाढल्यामुळे मालवाहतुकीचे दर मागील काही महिन्यांत वाढत चालले आहेत. शिवाय, मे 2022 च्या किमतीत कपात झाल्यानंतर डिझेलच्या किमतीही स्थिरता पाहायला मिळत आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने म्हंटले आहे की “ट्रकपेक्षा कमी लोड असलेल्या विभागात मजबूत मागणी वाढल्यामुळे लॉजिस्टिक क्षेत्रात कमालीची तेजी पाहायला मिळत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| VRL Logistics Stock To Buy recommended by stock market expert to earn huge returns on 12 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या