18 November 2024 9:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Welspun India Share Price | 1 महिन्यात गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देणारा शेअर, संयम ठेवल्यास हा शेअर आयुष्य बदलू शकतो

Welspun India Share Price

Welspun India Share Price | ‘वेलस्पन इंडिया’ या वस्त्रोद्योग क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यापासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. 29 मार्च 2023 रोजी ‘वेलस्पन इंडिया’ कंपनीचे शेअर्स 62.20 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहचले होते. 3 मे 2023 रोजी हा स्टॉक 105 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता.

मागील एका महिन्यात ‘वेलस्पन इंडिया’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 26.01 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.43 टक्के घसरणीसह 94.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

वेलस्पन इंडिया स्टॉक वाढीचे कारण :
वेलस्पन इंडिया कंपनीने नुकताच शेअर बायबॅकची घोषणा केल्याने शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. वेलस्पन इंडिया कंपनीने नुकताच 195 कोटी रुपयेची बायबॅक ऑफर जाहीर केली आहे. जेव्हा एखादी कंपनी आपल्या शेअर धारकांकडून शेअर्स परत खरेदी करते तेव्हा या प्रक्रियेला बायबॅक म्हणतात. वेलस्पन कंपनी 1.63 कोटी शेअर्स प्रति शेअर 120 रुपये या किमतीवर खरेदी करणार आहे. ही किंमत सध्याच्या बाजार भावापेक्षा 20 टक्क्यांनी अधिक असल्याने शेअर धारकांना याचा मजबूत फायदा होणार आहे.

27 एप्रिल 2023 रोजी ‘वेलस्पन इंडिया’ कंपनीने आपले मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. मार्च 2023 च्या तिमाहीत या कंपनीने 140 टक्के वाढीसह 125.4 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 52.2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

तथापि चौथ्या तिमाहीत या कंपनीच्या महसूलात मागील वर्षाच्या तुलनेत 3.3 टक्क्यांची घसरण झाली असून कंपनीने 2,154 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 2,227 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

वेलस्पन इंडिया कंपनीच्या स्टॉकवर ब्रोकरेज फर्म शेअरखानने ‘होल्ड’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करून वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे. मार्च तिमाही निकालांनंतर तज्ञांनी या कंपनीच्या स्टॉकवर 115 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. ही लक्ष किंमत सध्याच्या बाजारभावापेक्षा 15.69 टक्के अधिक आहे.

वेलस्पन इंडिया कंपनी आशिया खंडातील सर्वात मोठी आणि जगातील दुसरी सर्वात मोठी टेरी टॉवेल उत्पादक मानली जाते. वेलस्पन इंडिया कंपनी आपल्या उत्पादनापैकी 94 टक्के घरगुती कापड परकीय देशात निर्यात करते. त्याचे एकूण बाजारमूल्य 9,740 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Welspun India Share Price Today on 06 May 2023.

हॅशटॅग्स

Welspun India Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x