Westlife Foodworld Share Price | पिझ्झा-बर्गर खाण्यापेक्षा तो विकणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, 69000 रुपयांवर 1 कोटी रुपये परतावा दिला

Westlife Foodworld Share Price | ‘वेस्टलाइफ फूडवर्ल्ड’ या फास्ट फूड रेस्टॉरंट चेन चालवणाऱ्या कंपनीचे शेअर कमालीच्या तेजीत वाढत आहेत. काल हा स्टॉक NSE निर्देशांकावर 7.35 टक्के वाढला होता. तर आज गुरुवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी ‘वेस्टलाइफ फूडवर्ल्ड’ या कंपनीचे शेअर्स 0.47 टक्के वाढीसह 723.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ज्या लोकांनी 11 वर्षापूर्वी ‘वेस्टलाइफ फूडवर्ल्ड’ कंपनीच्या शेअरमधे 69 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1 कोटी रुपये झाले आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, ‘वेस्टलाइफ फूडवर्ल्ड’ कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमतवरून 9 टक्के अधिक वाढू शकतात. ‘वेस्टलाइफ फूडवर्ल्ड’ ही कंपनी दक्षिण भारतात बर्गर ब्रँड ‘मॅकडोनाल्ड’ ची फ्रँचायझी चालवते. (Westlife Foodworld Limited)
वेस्टलाइफ फूडवर्ल्ड स्टॉकवर तज्ञांचे मत :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने वेस्टलाइफ कंपनीच्या बिझनेस मॉडेलची प्रसंशा केली आहे. वेस्टलाइफ कंपनी आता नवीन बर्गरची श्रेणी लाँच करून, दक्षिण भारतात फ्राइड चिकनची बाजारपेठ वाढवून, कॅफे सेगमेंटमध्ये विस्तार करून व्यापार वाढीसाठी प्रयत्न करत आहे. कंपनीची दुसरी योजना म्हणजे, सर्व स्टोअर्स एका क्लिकवर अॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे. कंपनीची तिसरी रणनीती म्हणजे नेटवर्क विस्तार करणे. कंपनीने दरवर्षी 40-55 स्टोअर सुरू करण्याची योजना आखली आहे. कंपनीची चौथी रणनीती म्हणजे उत्पादनांचा दर्जा सुधारणे, खर्च कमी करणे, ऑपरेटिंग लिव्हरेजद्वारे मार्जिन 18-20 टक्क्यांनी वाढून देशातील वाढत्या फूड सर्व्हिस मार्केटचा फायदा उचलणे. या बाबींचा विचार करून ब्रोकरेज फर्मने ‘वेस्टलाइफ फूडवर्ल्ड’ कंपनीच्या शेअरवर 790 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.
गुंतवणुकदार करोडपती :
वेस्टलाइफ फूडवर्ल्ड’ कंपनीचे शेअर्स 22 मार्च 2012 रोजी 4.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत हा स्टॉक 14538 टक्क्यांनी वाढून 724.60 रुपयांवर पोहचला आहे. मागील 11 वर्षांत या कंपनीच्या गुंतवणूकदारांच्या भांडवलात 146 टक्क्यांची वाढ झाली आहे. ज्या लोकांनी 11 वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 69,000 रुपये लावले होते, ते लोक आता करोडपती झाले आहेत. दीर्घ काळात तसेच अल्पावधीतही हा स्टॉक मल्टीबॅगर सिद्ध झाला आहे. 12 मे 2022 रोजी ‘वेस्टलाइफ फूडवर्ल्ड’ कंपनीचे शेअर्स 402.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या 7 महिन्यांत शेअरची किंमत 103 टक्क्यांनी वाढून 6 डिसेंबर 2022 रोजी 815.25 रुपयांवर आली होती. तज्ज्ञांच्या मते पुढील काळात हा स्टॉक 9 टक्क्यांनी वाढून 790 रुपयांवर जाऊ शकतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Westlife Foodworld Share Price on o6 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL