8 November 2024 9:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, प्राईस बँड फक्त 20 ते 24 रुपये, संधी सोडू नका - GMP IPO HAL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, डिफेन्स शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL SJVN Share Price | SJVN शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN
x

मतदानाला जाताना घरातील गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा असं मोदी म्हणाले होते | आता ते जनतेला नमस्कार करतात

Gas Cylinder Cost | देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सामान्य जनता महागाईच्या आगीत होरपळून निघाली आहेत. मात्र अजूनही महागाई कमी होण्याचं नावं घेताना दिसत नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील याविषयी एक अक्षरही बोलताना दिसत नाहीत.

When you go to vote, do Namaskar to the gas cylinder at home as they are snatching that also said Narendra Modi in 2013 :

२०१३ मध्ये म्हणजे पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी प्रचारात महागाई, पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या किंमती प्रचारात केंद्रस्थानी ठेवल्या होत्या. त्यावेळी निवडणुकीच्या मतदानाचा संदर्भ देत मोदींनी ट्विट करून लोकांना आवाहन केले होते की, ‘मतदानाला जाल तेव्हा घरातील गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा’.

पंतप्रधान नरेंद्र मोदी – महागाईवर शांत राहून दुर्लक्ष :
पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या महागाईत आजपासून प्रत्येक घरात वापरला जाणारा गॅस सिलिंडरही महाग झाला आहे. त्याचवेळी काही दिवसांपूर्वी आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर लोकांच्या कर्जाचे हप्ते वाढले आहेत. बाजारात खाद्यपदार्थही महागले आहेत. अशा परिस्थितीत, कोणत्या शेअरमध्ये घरगुती गॅसचा सिलेंडर इतका महाग झाला आहे ते जाणून घेऊया. आणि होय, गॅस सिलिंडरचे हे वाढलेले दरही आजपासून लागू करण्यात आले आहेत.

जाणून घ्या दिल्लीत किती महाग झाला घरगुती गॅस सिलिंडर :
दिल्लीत घरोघरी येणारा 14.2 किलोचा गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महागला आहे. शनिवारी (7 मे 2022) दिल्लीत आता 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 999.50 रुपये प्रति सिलेंडरवर गेली आहे. यापूर्वी 22 मार्च 2022 रोजी घरगुती एलपीजीच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

इतर शहरांमध्ये गॅस सिलिंडर किती महाग झाले ते जाणून घ्या:
याशिवाय पाटण्यात 14.2 किलोचा घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर आता 1089.5 रुपये झाला आहे. त्याचवेळी लखनऊमध्ये 14.2 किलोचा घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर 1037.5 रुपये झाला आहे. याशिवाय पंजाबमध्ये गॅस सिलेंडरची किंमत 1035 रुपयांवर पोहोचली आहे.

प्रमुख शहरांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या :
* दिल्ली : रु. 999.50
* मुंबई : रु. 999.50
* कोलकाता: रु. 1,026
* चेन्नई : रु 1,015.50
* लखनौ : रु 1,037.50

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: When you go to vote do Namaskar to the gas cylinder at home said Narendra Modi in 2013.

हॅशटॅग्स

#Gas cylinder(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x