26 November 2024 2:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Free Home Loan | फ्री होम लोनसाठी वापरा 'ही' एक भन्नाट ट्रिक; व्याजाचे सर्व पैसे मिळून मालामाल व्हाल, लक्षपूर्वक वाचा TTML Share Price | TTML शेअर रॉकेट तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर स्टॉक फोकसमध्ये आला - NSE: TTML Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मजबूत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Low Cost Business | कमी पैशांत सुरू होणाऱ्या या व्यवसायातून करा लाखोंची कमाई; अशी करा सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण माहिती Quant Small Cap Fund | मार्ग श्रीमंतीचा, 10,000 रुपयांच्या SIP बचतीवर मिळतील 5 कोटी रुपये, इथे पैसा वाढवा - Marathi News Post Office Scheme | गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना; लाखोंचा परतावा हवा असल्यास, पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची BEL Vs HAL Share Price | BEL आणि HAL सहित हे 3 डिफेन्स शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL
x

Wipro Share Price | विप्रो शेअर खरेदी करा, स्टॉक प्राईस 680 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार, अपडेट नोट कर - NSE: WIPRO

Wipro Share Price

Wipro Share Price | विप्रो लिमिटेड कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल सकारात्मक आहेत. दुसऱ्या तिमाहीत विप्रो लिमिटेड कंपनीचे मार्जिन (NSE: WIPRO) वाढले आहे. नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचा बाबतीतही दुसरी तिमाही विप्रो लिमिटेड कंपनीसाठी चांगली राहिली आहे. अशा परिस्थितीत विप्रो लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची कामगिरी चांगली राहण्याची शक्यता आहे तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. फ्री बोनस शेअर्सच्या घोषणेमुळेही विप्रो शेअर्सची खरेदी वाढली आहे. सोमवार 21 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.21 टक्के वाढून 549.80 रुपयांवर पोहोचला होता. (विप्रो लिमिटेड कंपनी अंश)

प्रमुख बाजारपेठांमध्ये कंपनीची चांगली कामगिरी
अमेरिका आणि एपीएमईए सारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये तिमाही-दर-तिमाही वाढ दिसून आली आहे, तर युरोपियन बाजारांच्या कामगिरीत कॉन्स्टंट करन्सीमध्ये थोडी घसरण दिसून आली आहे. मात्र BFSI मध्ये विप्रो लिमिटेड कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. ग्राहक, आरोग्य आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्येही विप्रो लिमिटेड कंपनीने चांगली कामगिरी केली. विप्रो लिमिटेड कंपनीला दोन्ही वर्टिकलवर लक्ष केंद्रित करावे लागेल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

सलग दुसऱ्या तिमाहीत कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ
विप्रो लिमिटेड कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दुसऱ्या तिमाहीत एकूण ३.६ अब्ज डॉलर्सचे नवीन कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले आहेत. तिमाही आधारावर ऑर्डरबुकमध्ये ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विप्रो लिमिटेड कंपनीला मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यात देखील यश आले आहे. यामुळे भविष्यात चांगल्या कामगिरीसाठी विप्रो लिमिटेड कंपनीचा आत्मविश्वास सकारात्मक आहे. सलग दुसऱ्या तिमाहीत विप्रो लिमिटेड कंपनीने कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ केली, हे व्यवसायाच्या दृष्टीने सकारात्मक संकेत आहेत.

विप्रो शेअर – BUY रेटिंग आणि टार्गेट प्राईस
विप्रो लिमिटेड कंपनी शेअर शॉर्ट टर्ममध्ये दबावाला सामोरे जाऊ शकतो. मात्र त्यानंतर एक्झिक्युशन’बाबत परिस्थिती चांगली राहण्याची अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच इन्फोसिस आणि TCS च्या तुलनेत विप्रो लिमिटेड कंपनी अजूनही आयटी उद्योगातील आघाडीच्या स्थानापासून दूर आहे. आणि त्याचा परिणाम मूल्यांकनातही स्पष्ट दिसून येतो. परंतु, चांगल्या एक्झिक्युशन’मुळे वॅल्युएशनमधील फरक कमी होण्याची अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने विप्रो लिमिटेड कंपनी शेअरसाठी ६७० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच नोमुरा ब्रोकरेज फर्मने विप्रो लिमिटेड कंपनी शेअरसाठी ६८० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Wipro Share Price 21 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Wipro Share Price(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x