15 January 2025 5:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Wipro Share Price | विप्रो शेअर टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक BUY करावा की Sell?

Wipro Share Price

Wipro Share Price | मंगळवारी 23 जुलै 2024 रोजी विप्रो स्टॉक 509 रुपये किमतीवर ओपन झाला होता. त्यानंतर संसदेत बजेट सादर झाला, आणि शेअरमध्ये जबरदस्त नफा वसुली सुरू झाली होती. आज हा स्टॉक किंचित रिकव्हर झाला आहे. ( विप्रो कंपनी अंश )

मात्र पुढील काळात हा आयटी स्टॉक खाली जाऊ शकतो, अशी चिंता तज्ञांनी व्यक्त केली आहे. तज्ञांनी गुंतवणुकदारांना या स्टॉकमध्ये नवीन पोझिशन घेण्यास नकार दर्शवला आहे. आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी विप्रो स्टॉक 0.59 टक्के वाढीसह 503.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, विप्रो स्टॉकने खालच्या स्तरावर 480-460 रुपये किमतीजवळ मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. शेअरचा टेक्निकल चार्ट पाहून तज्ञांनी घसरणीचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच गुंतवणुकदारांना वाढीसह नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे.

मागील पाच दिवसांत विप्रो स्टॉक 9 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत फक्त 3 टक्के वाढली आहे. मागील सहा महिन्यांत विप्रो स्टॉक सात टक्क्यांनी वाढला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील आठवड्यात विप्रो या भारतातील तिसऱ्या सर्वात मोठ्या आयटी कंपनीने आपले जून 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. जून तिमाहीत कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 4.6 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या तिमाहीत कंपनीने 3,003.2 कोटी रुपये नफा कमावला आहे. जून तिमाहीत कंपनीचा महसूल 3.8 टक्क्यांच्या घसरणीसह 21,963.8 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तज्ञांच्या मते, सप्टेंबर 2024 तिमाहीत आयटी सेवा व्यवसाय विभागातील कंपनीचा स्थिर चलन महसूल 2,600 दशलक्ष डॉलर्स ते 2,652 दशलक्ष डॉलर्स दरम्यान असेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Wipro Share Price NSE Live 24 July 2024.

हॅशटॅग्स

#Wipro Share Price(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x