5 November 2024 9:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

Womancart Share Price | एकदिवसात 36 टक्के परतावा मिळाला! वुमनकार्ट IPO शेअरने सूचीबद्ध होताच गुंतवणूकदारांचा खिसा पैशाने भरला

Womancart Share Price

Womancart Share Price | वुमनकार्ट लिमिटेड कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह सूचीबद्ध झाले आहेत. वुमनकार्ट कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची अप्पर किंमत बँड 86 रुपये निश्चित करण्यात आली होती. तर वुमनकार्ट लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 36 टक्क्यांच्या वाढीसह 117 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत.

स्टॉक लिस्टिंग झाल्यानंतर लगेचच वुमनकार्ट कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 122.85 रुपये किमतीवर पोहोचले होते. ज्या गुंतवणूकदारांनी वुमनकार्ट लिमिटेड कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य पहिल्याच दिवशी 40 टक्के वाढले आहेत. वुमनकार्ट कंपनीच्या IPO चा आकार 9.56 कोटी रुपये होता.

वुमनकार्ट लिमिटेड कंपनीचा IPO 67 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 71.94 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. त्याच वेळी या IPO मध्ये इतर श्रेणींसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 56.30 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. वुमनकार्ट लिमिटेड कंपनीचा आयपीओ लाँच होण्यापूर्वी कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 78.01 टक्के भाग भांडवल धारण केले होते. आता हे प्रमाण 57.40 टक्क्यांवर आले आहे.

वुमनकार्ट कंपनीची स्थापना 2018 साली झाली होती. वुमनकार्ट लिमिटेड कंपनी एक ऑनलाइन रिटेल प्लॅटफॉर्म प्रदान करते. ही कंपनी पुरुष आणि स्त्रियांना त्वचेची निगा राखणे सौंदर्य प्रसाधन उत्पादने, केसांची निगा आणि शरीराची निगा राखणारे सौंदर्य ब्रँड आणि वेलनेस उत्पादने बनवण्याचे काम करते.

किरकोळ गुंतवणूकदार या कंपनीच्या IPO मध्ये 1600 शेअर्सचा एक लॉट खरेदी करू शकत होते. किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी 137600 रुपये जमा करावे लागले होते. वुमनकार्ट लिमिटेड कंपनीचा IPO 16 ऑक्टोबर 2023 ते 18 ऑक्टोबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. रवुमनकार्ट लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 86 रुपये निश्चित केली होती.

या कंपनीचे शेअर्स एनएसई एसएमई एक्सचेंजवर सूचीबद्ध करण्यात आले आहेत. वुमनकार्ट लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मधून उभारलेला निधी ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग खर्च, अॅप डेव्हलपमेंट, खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करण्याची योजना आखली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Womancart Share Price NSE 28 October 2023.

हॅशटॅग्स

Womancart Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x