11 January 2025 1:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | इरेडा शेअर 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA IPO GMP | स्वस्त IPO आला रे, GMP रॉकेट तेजीत, फक्त 14,124 रुपयांची गुंतवणूक मालामाल करणार - IPO Watch Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या; आर्थिक चणचण जाणवत असेल तर घरच्या घरी तुफान चालणारे व्यवसाय सुरू करा Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Railway Ticket Booking | 90 टक्के रेल्वे प्रवाशांना माहित नाही, स्लीपर कोचच्या भाड्यात AC कोचने प्रवास करू शकता Step Up SIP Calculator | पगारदारांनो, स्टेप-अप SIP ऑप्शन'मधून मोठा परतावा मिळवा, अशा प्रकारे 1 कोटी रुपये कमाई होईल 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट
x

Yes Bank Share Price | येस बँकेबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार प्राईस, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News

Highlights:

  • Yes Bank Share PriceNSE: YESBANK – येस बँक अंश
  • येस बँकेची जुलै-सप्टेंबर तिमाही आकडेवारी
  • एसबीआयने येस बँकेत गुंतवणूक केली
Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स गुरूवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी 22.42 रुपये किमतीवर ओपन झाले होते. आज या बँकेच्या शेअर्समध्ये (NSE: YESBANK) जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. मागील एका आठवड्यात येस बँकेचे शेअर्स 2 टक्के घसरले होते. मागील एका महिन्यात हा स्टॉक 6 टक्के आणि तीन महिन्यांत 7 टक्के घसरला होता. नुकताच येस बँकेने आपले जुलै-सप्टेंबर 2024 तिमाहीशी संबंधित आकडेवारी जारी केली आहे. (येस बँक अंश)

येस बँकेची जुलै-सप्टेंबर तिमाही आकडेवारी
वर्ष-दर-वर्ष आधारावर येस बँकेच्या एकूण कर्ज आणि अग्रिममध्ये 13.1 टक्क्यांची वाढ झाली आहे. येस बँकेचे कर्ज आणि अग्रिम 2.36 लाख कोटी रुपये झाले आहे. शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 1.05 टक्के वाढीसह 22.09 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.

येस बँकेचा क्रेडिट ते डिपॉझिट गुणोत्तर 86.6 टक्केवरून कमी होऊन 85.3 टक्केवर आला आहे. येस बँकेचा CASA 8.6 टक्के वाढून 88,559 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तिमाही-दर-तिमाही आधारावर येस बँकेचे कर्ज आणि अग्रिम 3 टक्के वाढून 2.36 लाख कोटी रुपये नोंदवले गेले आहे. येस बँकेच्या ठेवी 4.6 टक्के वाढून 2.77 लाख कोटीवर पोहोचले आहे.

एसबीआयने येस बँकेत गुंतवणूक केली
एसबीआय ही भारतातली सर्वात मोठी सार्वजनिक बँक येस बँकमध्ये आर्थिक गुंतवणूकदार आहे. जर एसबीआयने येस बँकमध्ये आर्थिक अडचणीच्या काळात गुंतवणूक केली नसती तर येस बँक पूर्णपणे दिवाळखोर झाली असते. याचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर देखील नकारात्मक परिणाम झाला असता. अनेक वेळा SBI खाजगी क्षेत्रातील आर्थिक अडचणीत असणाऱ्या बँकांना सहाय्य करत असते. यामुळे गुंतवणूकदारांच्या आणि बँक ठेवीदारांच्या हितांचे संरक्षण केले जाते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Yes Bank Share Price 04 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(209)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x