24 April 2025 6:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 25 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | इरेडा शेअरबाबत महत्वाचे संकेत; मल्टिबॅगर स्टॉकची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Zomato Share Price | झोमॅटो शेअरसाठी अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मिळेल 30% परतावा - NSE: ETERNAL GTL Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, नेमकं कारण काय? 8 टक्क्यांची उसळी - NSE: GTLINFRA RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने कमाई होईल, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: RVNL IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC
x

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये पुन्हा गडगडाट? शेअरची अवस्था बिघडणार की उभारी घेणार? डिटेल्स जाणून घ्या

Yes Bank share Price

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची अवस्था पुन्हा एकदा बिकट झाली आहे. 13 डिसेंबर 2022 रोजी Yes Bank शेअर्स 24.75 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. मात्र आता पुन्हा एकदा येस बँकेच्या शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळत आहे. येस बँक कंपनीचे शेअर गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी 0.75 टक्के घसरणी सह 19.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच येस बँकेचे शेअर सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 20 टक्के कमजोर झाले आहेत. येस बँक शेअर पुन्हा एकदा बाउन्स घेईल? चला तर मग जाणून घेऊ. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)

येस बँक शेअर लक्ष्य किंमत :
येस बँक कंपनीचे शेअर्स फॉलो करणाऱ्या तज्ञांच्या मते एसबीआयच्या नियंत्रणाखाली कामकाज आल्यापासून येस बँकेच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. याशिवाय वित्त मंत्रालयाने बुडीत कर्जाबाबत घेतलेल्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम येस बँकेच्या आर्थिक स्थितीवर पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत येस बँकेचे शेअर्स सध्या 17.50 ते 19 रुपये किमतीच्या दरम्यान ट्रेड करत आहे. ही किंमत खरेदीसाठी उत्तम मानली जात आहे. शेअर मार्केट तज्ञांनी 17 रुपयांचा स्टॉप लॉस लावून अल्प मुदतीसाठी 28 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तर मध्यम मुदतीसाठी 36 रुपये लक्ष किमतीसाठी तुम्ही स्टॉक होल्ड करु शकता. आणि लाँगटर्मसाठी तज्ञ 44 रुपये या लक्ष किमतीसाठी स्टॉक खरेदी करण्याची शिफारस करत आहेत.

शेअर बाजार तज्ज्ञांनी काय सांगितलं?
एम्के ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संदीप पांडे यांनी ट्रेडर्सना येस बँकेत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. “उच्च-जोखीम गुंतवणूकदार येस बँकेच्या शेअर्सकडे पाहू शकतात कारण ते तेजीत येणार आहेत. अर्थ मंत्रालयाने हाती घेतलेल्या बुडीत कर्ज उपक्रमाचा हा सर्वात मोठा फायदा येस बँकेला होणार आहे. येस बँकेचा शेअर पुढील काळात प्रति शेअर ६० रुपयांच्या पातळीवर जाऊ शकतो. म्हणजेच येस बँकेच्या भागधारकांना गुंतवणुकीवर किमान २०० टक्के परतावा मिळू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटले आहे.

येस बँकेच्या शेअर्समध्ये इतकी पडझड झाली आहे की, शेअर्स आता आपल्या ५२ आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 20 टक्के खाली आले आहेत. जीसीएल सिक्युरिटीज फर्मचे सीईओ रवी सिंघल यांनी माहिती दिली आहे की,” यस बँकेचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळी वरून खाली घसरण्यामागे ‘लॉक इन’ कालावधी पूर्ण होणे, हे कारण मानले जात आहे. Axis Bank, IDFC First Bank आणि HDFC बँक यांचाही लॉक-इन कालावधी मार्च 2023 मध्ये पूर्ण होणार आहे. यामुळेच किरकोळ गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकींग सुरू केली आहे.

मायक्रोसॉफ्ट आणि येस बँक करार :
आजच्या युगात बँकिंग प्रणालीमध्ये वेगाने सुधारणा होत आहेत. येस बँक आपल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वेगाने तंत्रज्ञान बदल करत आहे. येस बँक सुधारणा करण्याच्या बाबतीत कोणाच्याही मागे पडू इच्छित नाही. येस बँकेने मंगळवारी एका निवेदनात म्हंटले आहे की, कंपनीने फोर्थ जनरेशन पिढीतील मोबाइलसाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीसोबत एक व्यापारी करार केला आहे. येस बँक मायक्रोसॉफ्टच्या मदतीने आपल्या नवीन अॅपमध्ये बँकिंग सुविधांव्यतिरिक्त ऑनलाइन पेमेंट, शॉपिंग, रिवॉर्ड्स ऑफर्स, तसेच कस्टमाइज्ड डॅशबोर्ड, या सर्व सुविधा जोडण्याचा प्रयत्न येस बँक करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : YES Bank Share Price in focus 532648 YESBANK check details on 12 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या