25 December 2024 11:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची परदेशी गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून नवीन टार्गेट प्राईस

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | सध्या येस बँक शेअर्स चर्चेचा विषय बनले आहे कारण, दोन जागतिक खाजगी इक्विटी कंपन्यांनी येस बँकेत गुंतवणूक वाढवली आहे. यामुळे येस बँकेतील FPIs ची एकूण होल्डिंग लक्षणीयरीत्या वाढली आहे. डिसेंबर अखेरीस येस बँकेतील एकूण एफपीआय होल्डिंग 23.24 टक्के वर गेली आहे. त्याच वेळी सप्टेंबर तिमाहीपर्यंत येस बँकेत एफपीआयची गुंतवणूक 12.15 टक्के होती. FPIs कडे मार्च 2022 पर्यंत 10.97 टक्के भाग भांडवल होते. खाजगी इक्विटी फर्म कारलाइल ग्रुप आणि अॅडव्हेंट इंटरनॅशनलने येस बँकेचे 10 टक्के भाग भांडवल हिस्सा खरेदी करून 8,900 कोटी रुपयांची गुंतवणुक केली आहे. अलीकडच्या काळात भारतीय बँकिंग क्षेत्रात खाजगी इक्विटी फर्मकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 1.48 टक्के वाढीसह 17.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)

तज्ञांचे मत :
येस बँकेचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE निर्देशांकावर 2 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर दिवसा अखेर येस बँकेचे शेअर 1.22 टक्के वाढीसह 16.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. येस बँक स्टॉकबाबत अनेक तज्ञांनी तेजीचे संकेत दिले आहेत. आयआयएफएल सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी म्हंटले आहे की, येस बँकेच्या स्टॉकवर 19 रुपये किमतीवर सपोर्ट लेव्हल पाहायला मिळत आहे. आणि पुढील काळात शेअरची किंमत 21-23 रुपयांपर्यंत वाढू शकते, असे तज्ञांना वाटते. येस बँकेच्या स्टॉकने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 21.62 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी येस बँक स्टॉक मागील तीन वर्षांत 56.81 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. तर त्या तुलनेत सेन्सेक्स निर्देशांक 46.48 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.

येस बँक तिमाही निकाल :
डिसेंबर 2022 च्या तिमाहीत येस बँकेच्या निव्वळ नफ्यात 79 टक्क्यांची घट झाली आहे. येस बँकेने या तिमाहीत फक्त 55.07 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत येस बँकेने बुडीत कर्जासाठी अधिक तरतुदी केल्या, आणि त्याचा नकारात्मक परिणाम बँकेच्या तिमाही निकालावर पाहायला मिळाला. डिसेंबर तिमाहीत येस बँकेचे बिगर व्याज उत्पन्न 55.8 टक्क्यांच्या वाढीसह 1,143 कोटी रुपयेवर पोहचले होते, तर कॉर्पोरेट बाँडची विक्री करून येस बँकेने 100 कोटी रुपये कमावले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : YES Bank Share Price in focus 532648 YESBANK stock market live on 08 February 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(203)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x