Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची किंमत 1 महिन्यात 30% घसरली, तरी तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, नेमकं कारण काय?
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून येस बँकच्या शेअरला उतरती कळा लागली आहे. 13 डिसेंबर 2022 रोजी येस बँक शेअर 24.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ही येस बँक शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत होती. मात्र त्यानंतर येस बँक शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढू लागला आणि शेअरची किंमत पडली. अवघ्या एका महिन्यात येस बँकेच्या शेअरची किंमत 30 टक्क्यांनी घटली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. येस बँकेचे शेअर खरेदी करावे, की करू नये असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
येस बँक स्टॉकबाबत तज्ज्ञांचे मत :
येस बँकेचे शेअर्स सध्याच्या घसरत्या पातळीवरून सावरतील असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. येस बँकेच्या शेअरची किंमत पडण्याचे मुख्य कारण म्हणजे, डिसेंबर 2022 मधील कमजोर तिमाही निकाल आणि मुंबई उच्च न्यायालयाचा बँकेच्या विरोधात आलेला निर्णय. यामुळे येस बँकेच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने AT-1 बॉड्सशी संबंधित प्रकरणात बँकेच्या प्रशासकाचा निर्णय रद्द केला होता.
जीसीएल सिक्युरिटीज फर्म तज्ञ
येस बँकेच्या शेअरच्या घसरणीचे कारण स्पष्ट करताना जीसीएल सिक्युरिटीज फर्म तज्ञ म्हणाले की, “येस बँकेच्या शेअर्सेच्या घसरणीची दोन मुख्य कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आणि दुसरे कारण डिसेंबर 2022 मधील तिसऱ्या तिमाहीचे कमजोर निकाल. स्टॉक मध्ये थोडीफार सुधारणा होऊ शकते, असे तज्ञांना वाटते. म्हणून तज्ञांनी येस बँकेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकाना 17 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवून शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
प्रॉफिट मार्ट सिक्युरिटीज फर्म तज्ञ
प्रॉफिट मार्ट सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी ही सल्ला दिला आहे की, “गुंतवणूकदारांनी 17 रुपयेचा स्टॉप लॉस लावून शेअर खरेदी करण्यास हरकत नाही. येस बँक शेअरचे चार्ट पॅटर्न पाहता असे दिसते की बँकेचे शेअर्स सध्याच्या पातळींवरून वर जाऊ शकतात. आणि पुढील काळात शेअरची किंमत 20 ते 22 रुपयांवर जाईल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. समजा जर येस बँकेचे शेअर्स 15 रुपयांच्या खाली आले तर थोडी वाट पहा, स्टॉक स्टेबल झाला की, खरेदीला सुरुवात करा. अशा परिस्थितीत दीर्घकालीन गुंतवणूकदार यामध्ये पैसे लावू शकतात. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 2.51 टक्के कमजोरीसह 17.45 रुपये किमतीवर बंद झाले होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : YES Bank Share Price in focus 532648 YESBANK stock market live on 28 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल