18 April 2025 6:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Yes Bank Share Price | येस बँक बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिला सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँक लिमिटेडचा शेअर मागील काही महिन्यांपासून अंडरपरफॉर्मर आहे. मागील एक महिन्यांत येस बँक शेअर्स 11.31 टक्क्यांनी घसरला आहे, तर स्टॉक मार्केट निफ्टी २.६ टक्क्यांनी घसरला आहे. दरम्यान, येस बँके लिमिटेडने आपल्या स्ट्रेस्ड एसेट्सचा मोठा भाग एसेट रीकंस्ट्रक्शन कंपनीकडे ट्रान्स्फर केल्यानंतर आणि प्रवर्तक एसबीआयद्वारे हिस्सा विक्रीची चर्चा समोर आल्यानंतर बॅंकेच्या आर्थिक निकालांमध्ये सकारात्मक सुधारणा दिसून आली आहे. त्यानंतर येस बँक लिमिटेड बाबत तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले आहेत. (येस बँक लिमिटेड अंश)

तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांना महत्वाचा सल्ला

मात्र, कमकुवत रिटर्न ऑन एसेट्स (आरओए) आकडे लक्षात घेता तज्ज्ञांना वाटते की, ‘येस बँक लिमिटेडचे व्हॅल्युएशन योग्य नाही आणि त्यामुळे गुंतवणूकदारांनी सध्या ‘वेट अँड वॉच’ करावा लागू शकते. येस बँक लिमिटेडचे मार्केट कॅप सध्या 67,308 कोटी रुपये आहे. सोमवार 16 डिसेंबर 2024 रोजी येस बँक शेअर 1.66 टक्के वाढून 21.44 रुपयांवर पोहोचला होता.

FD डिपॉझिटबाबत उत्तम कामगिरी

बँक डिपॉझिट मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा असताना येस बँके लिमिटेडने सकारात्मक कामगिरी केली आहे. दुसऱ्या तिमाहीत येस बँके लिमिटेडची वार्षिक FD वाढ 18% होती, तर तिमाही आधारावर त्यात 4.6% वाढ झाली आहे. तसेच, येस बँके लिमिटेडने इंडस्ट्री ट्रेंडच्या उलट आपल्या करंट आणि सेव्हिंग खात्यातील (CASA) ठेवींमध्ये जोरदार वाढ नोंदवली आहे. येस बँके लिमिटेडचे CASA गुणोत्तर एकूण ठेवींच्या ३२ टक्के इतके आहे, जे गेल्या वर्षी याच कालावधीत २९.४ टक्के इतके होते.

येस बँकेची NPA स्थिती

येस बँके लिमिटेडची एकूण मालमत्तेची गुणवत्ता स्थिर राहिली आहे. दुसऱ्या तिमाहीत येस बँके लिमिटेडचे सकल आणि निव्वळ एनपीए अनुक्रमे 1.6% आणि 0.5% होते, तर प्रोव्हिजन कव्हर 70% होते. तसेच, ग्रॉस स्लिपेज (कर्जाच्या 2.2 टक्के) 1,314 कोटी रुपये तिमाही आधारावर अधिक होती. ३५ ते ४० टक्के रिटेल स्लिपेज अनसिक्योर्ड बुकमुळे होत असल्याचे येस बँके लिमिटेडच्या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

येस बँके लिमिटेडचा पर्याय का पाहावा?

स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी पुढे म्हटले की, ‘विकासाच्या आघाडीवर चांगली स्थिती असल्याने येस बँक लिमिटेडला भारतीय बाजारपेठेत संभाव्य भागीदार मिळू शकेल, असा आमचा विश्वास आहे. मात्र, त्यासाठी निश्चित कालावधी सांगणे कठीण असल्याने केवळ उच्च जोखमीच्या आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांनीच येस बँक शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार केला पाहिजे असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

येस बँक शेअरने 73.48 टक्के परतावा दिला

मागील ५ दिवसात येस बँक शेअर 0.79% घसरला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 11.31% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात येस बँक शेअर 9.83% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 5.88% घसरला आहे. मागील ५ वर्षात येस बँक शेअर 58.25% घसरला आहे. YTD आधारावर हा शेअर 5.25% घसरला आहे. मात्र लॉन्ग टर्म मध्ये येस बँक शेअरने 73.48% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Yes Bank Share Price Monday 16 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या