18 November 2024 3:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर आजही तेजीत, नेमकं कारण काय? 20 रुपयाच्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस तज्ज्ञांकडून जाहीर

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँक स्टॉक मध्ये मागील काही काळापासून मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील पाच वर्षांत येस बँकेचे शेअर्स 90 टक्क्यांनी घसरले होते. मात्र आता येस बँकेचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. मागील शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 18.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

त्यानंतर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक स्टॉक सपाट वाढीसह ओपन झाला होता. 29 मार्च 2019 रोजी येस बँकेचे शेअर्स 275.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 31 जुलै 2020 रोजी पर्यंत हा स्टॉक 11.95 रुपये किमतीवर आला होता. आज शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी येस बँक स्टॉक 1.49 टक्के वाढीसह 20.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका महिन्यांत येस बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. याकाळात येस बँक स्टॉक 14 रुपयेवरून वाढून 24.75 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील सहा महिन्यांत येस बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 28 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 2023 यावर्षात येस बँक स्टॉक 8 टक्क्यांनी घसरला आहे. येस बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 24.75 रुपये होती.

येस बँक स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, बँकेच्या एनपीए पोर्टफोलिओच्या विक्रीतून रिडम्प्शन रकमेची माहिती सेबीला कळवली आहे. येस बँकेने आपल्या NPA पोर्टफोलिओच्या विक्रीतून 120 कोटी रुपये रक्कम प्राप्त केली आहे.

यामुळे येस बँकेचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. तज्ञांच्या मते येस बँकेचे शेअर्स पुढील काळात 25 रुपये किमतीवर जाऊ शकतात. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 18 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE 17 November 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(193)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x