18 November 2024 8:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN
x

Yes Bank Share Price | 6 महिन्यांत 40% परतावा देणारा येस बँक शेअर घसरू लागला, स्टॉकमध्ये घसरणीचे कारण काय?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. मात्र आज या बँकिंग स्टॉकमध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे.

शुक्रवारी येस बँकेचे बीएसई निर्देशांकावर 3.10 टक्क्यांच्या वाढीसह 23.97 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मात्र या आठवड्याच्या सुरुवात येस बँक स्टॉकसाठी फारशी चांगली झाली नाहीये. आज सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी येस बँक स्टॉक 1.46 टक्के घसरणीसह 23.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ऑक्टोबर 2023 मध्ये येस बँकेचे शेअर्स 14.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र जानेवारी 2024 पर्यंत येस बँक स्टॉक 72 टक्क्यांनी वाढला आहे. मागील एका महिनाभरात येस बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के नफा कमावून दिला आहे. येस बँक आता आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल केले आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत येस बँकेचे कर्ज आणि ऍडव्हान्स प्रमाण 2,17,662 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. वार्षिक वार्षिक आधारावर यात 11.9 टक्के अधिक वाढ नोंदवली गेली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत येस बँकेचे कर्ज आणि ऍडव्हान्स प्रमाण 1,94,573 कोटी रुपये नोंदवले गेले होते. तिमाही दर तिमाही आधारे येस बँकेच्या कर्ज आणि ऍडव्हान्स प्रमाणात 4.1 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

चालू तिमाहीत येस बँकेच्या ठेवींमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 13.2 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. येस बँकेकडे सध्या एकूण जमा भांडवल 2,41,831 कोटी रुपये होते. याशिवाय बँकेचे एकूण क्रेडिट टू डीपोजिट प्रमाण घसरून 90 टक्क्यांवर आले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 08 January 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(194)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x