18 November 2024 3:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सची ट्रेडिंग रेंज 20-30 रुपये मध्ये अडकली, सकारात्मक बातमीनंतर तज्ज्ञांनी काय म्हटलं?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँक बाबत एक नवीन अपडेट आली आहे. जपानस्थित मित्सुबिशी UFJ फायनान्शियल ग्रुप आणि सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्प यांनी येस बँकेमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी येस बँकेचे बहुसंख्य भांडवल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ( येस बँक अंश )

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली या दोन्ही गुंतवणूक संस्थेसोबत गुंतवणुकी संदर्भात चर्चा सुरू आहे. आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.21 टक्के वाढीसह 24 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील कंसोर्टियमकडे येस बँकेचे 51 टक्के भाग भांडवल आहेत. त्यांनी येस बँकेचे 51 टक्के भाग भांडवल खरेदी करण्यासाठी 35,578 कोटी रुपये गुंतवणूक केली होती. आता त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 69,762 कोटी रुपये आहे. या कन्सोर्टियममध्ये फक्त SBI ने येस बँकेचे 26.13 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

MUFG आणि SMBC या दोन्ही जपानस्थित संस्था येस बँकेचे मूल्यांकन करत असून ते भारतासारख्या तेजीत वाढणाऱ्या बाजारपेठेत गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. जपानस्थित मिझुहो बँक देखील भारतामध्ये मोठी गुंतवणूक करण्यास उत्साही आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये मिझुहो बँकेने तिच्या देशांतर्गत शाखांमध्ये 4,100 कोटी रुपये मूल्याची गुंतवणूक केली होती.

फेब्रुवारी 2024 मध्ये, क्रेडिट सेसन इंडिया कंपनीमध्ये त्यांनी 1,200 कोटी रुपये मूल्याची धोरणात्मक गुंतवणूक केली होती. तज्ञांच्या मते, जून 2024 तिमाहीपर्यंत जर येस बँक स्टॉक 24-25 रुपये किमतीच्या वर राहिला तर, अल्पावधीत शेअर 30 रुपये किमतीच्या पार जाऊ शकतो. कारण येस बँक स्टॉकची ट्रेडिंग रेंज 20-30 रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 16 April 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(193)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x