18 November 2024 8:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.4 टक्के घसरणीसह 25.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज येस बँकेचे हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. 9 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 32.81 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. त्यांनतर अवघ्या आठ ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेचे शेअर्स 22 टक्के कमजोर झाले आहेत. आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 2.94 टक्के वाढीसह 26.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच मॉर्गन स्टॅन्लेने येस बँकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. 15 फेब्रुवारी रोजी कार्लाइल ग्रुपने येस बँकेतील आपले 1.3 टक्के भाग भांडवल 1,057 कोटी रुपयेला खुल्या बाजारात विकले होते. तर यूएसए स्थित कार्लाइल ग्रुपची उपकंपनी असलेल्या सीए बास्क इन्व्हेस्टमेंट फर्मने देखील येस बँकेचे 39 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकले होते.

येस बँकेतील कार्लाइल ग्रुपची हिस्सेदारी 6.43 टक्केवरून कमी होऊन 5.08 टक्केवर आली आहे. तरदुसरीकडे, Morgan Stanley Asia Singapore Pte फर्मने त्याच दिवशी येस बँकेचे 30 कोटी शेअर्स 27.10 रुपये किमतीवर खरेदी करून 830 कोटी रुपयेची गुंतवणूक केली होती. हे प्रमाण एकूण इक्विटीच्या 1.06 टक्के होते.

तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉकमध्ये 27 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, येस बंकेचे शेअर्स पुढील काळात 35 रुपये ते 38 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. येस बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांचा उच्चांक किंमत पातळी 32.81 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 14.10 रुपये होती.

येस बँकेचे एकूण बाजार भांडाल 73,461.55 कोटी रुपये आहे. येस बँकेने डिसेंबर 2023 ला संपलेल्या तिमाहीत 231 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत येस बँकेने 51.5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. येस बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक आधारावर 2.3 टक्के वाढून 2,016.8 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 22 February 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(193)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x