22 January 2025 9:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर तेजीने देणार परतावा, बँकेबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच येस बँकेने आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. एप्रिल ते जून 2024 या तिमाही कालावधीत येस बँकेच्या नफ्यात जबरदस्त वाढ नोंदवली गेली आहे. जून तिमाहीत येस बँकेने तब्बल 502.43 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ( येस बँक अंश )

मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीच्या तुलनेत येस बँकेचा नफा 46.40 टक्के वाढला आहे. जून 2023 तिमाहीत येस बँकेने 342.52 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आज सोमवार दिनांक 22 जुलै 2024 रोजी येस बँक स्टॉक 2.26 टक्के वाढीसह 25.33 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जून 2024 तिमाहीत येस बँकेने एकूण 7719.15 कोटी रुपये व्याज उत्पन्न कमावले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीच्या तुलनेत येस बँकेचे व्याज उत्पन्न 19 टक्के वाढले आहे. येस बँकेने जून 2024 च्या तिमाहीत 6443.22 कोटी रुपये व्याज उत्पन्न कमावले होते. जून तिमाहीत येस बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 12.2 टक्क्यांच्या वाढीसह 2243.90 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत येस बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 2000 कोटी रुपये होते.

जून तिमाहीत येस बँकेच्या एनपीएमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मागील तिमाहीत देखील येस बँकेचा NPA 1.7 टक्क्यांवर होता. मात्र या बँकेचा निव्वळ एनपीए 0.5 टक्केवरून वाढून 0.6 टक्क्यांवर गेला आहे. एप्रिल ते जून 2024 या तिमाहीत येस बँकेच्या एकूण ठेवी 2,65,072 कोटी रुपये होत्या.

मागील आठवड्यात शुक्रवारी या बँकेचे शेअर्स 4 टक्क्यांनी घसरले होते. तिमाही निकालापूर्वी येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली होती. येस बँकेचे शेअर्स शुक्रवारी 3.80 टक्के घसरणीसह 24.78 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात येस बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 42 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 22 July 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(211)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x
close ad x
Marathi Matrimony