17 September 2024 1:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shraddha Arya | दिपीकानंतर अभिनेत्री श्रद्धा आर्यने दिली गूडन्यूज; बीचवरचा दोघांचा 'तो' व्हिडियो होतोय वायरल - Marathi News BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राइस नोट करा - Marathi News NMDC Share Price | झटपट कमाईची मोठी संधी, NMDC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, संधी सोडू नका - Marathi News Post Office Saving Scheme | 1 हजाराच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला सलग 5 वर्ष मिळतील रु.20000; फायदा घ्या - Marathi News Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट, स्टॉक रॉकेट स्पीडने देणार परतावा - Marathi News Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरची जादू, 1 वर्षात 1 लाख रुपयांचे झाले 2.3 कोटी रुपये - Marathi News EPFO Passbook | नोकरदारांनो! EPF बॅलेन्स चेक करण्यासाठी हे 4 मार्ग आहेत बेस्ट, घरबसल्या होईल काम - Marathi News
x

Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपग्रेड, स्टॉक 'BUY' करावा का?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | रेटिंग एजन्सी क्रिसिलने येस बँकेच्या रेटिंगमध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त (NSE: YESBANK) उलाढाल पाहायला मिळत आहे. क्रेडिट रेटिंग एजन्सी CRISIL ने येस बँकेच्या टियर-2 बाँड्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर बाँड्ससाठी दीर्घकालीन रेटिंग अपग्रेड केली आहे. CRISIL ने येस बँकेची रेटिंग ‘A पॉझिटिव्ह’ वरून ‘A+ स्थिर’ अशी अपग्रेड केली आहे. यासह, रेटिंग एजन्सी CRISIL ने येस बँकेच्या ठेव प्रमाणपत्रावरील अल्प-मुदतीची रेटिंग ‘A1+ अप’ अशी अपग्रेड केली आहे. ( येस बँक अंश )

आज सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.62 टक्के घसरणीसह 24.24 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी येस बँकेचे शेअर्स 1.09 टक्के वाढीसह 24.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवारी या बँकेचे शेअर्स 24.58 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. YTD आधारे येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे.

2024 या वर्षात येस बँक स्टॉक 6 टक्क्यांनी घसरला आहे. येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 77,282 कोटी रुपये होते. येस बँक स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 50.4 अंकावर आहे. हा स्टॉक ओव्हरसोल्ड झोनच्या खाली ट्रेड करत आहे. येस बँक स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस, 200 दिवसांच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर ट्रेड करत आहे, मात्र हा स्टॉक आपल्या 30 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेज किंमत पातळीच्या खाली व्यवहार करत आहे.

येस बँकेने जून तिमाहीत निव्वळ नफ्यात 47 टक्के वाढ नोंदवली आहे. या कालावधीत बँकेचा निव्वळ नफा 502.43 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. एका वर्षभरापूर्वी याच तिमाही काळात येस बँकेचा नफा 342.52 कोटी रुपये नोंदवला गेला होता. आर्थिक वर्ष 2024-25 च्या जून तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न 17.59 टक्के वाढीसह 8,918.14 कोटी रुपये नोंदवले गेले होते. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत येस बँकेचे उत्पन्न 7,584.34 कोटी रुपये नोंदवले गेले होते.

येस बँकेने आपले व्यवसाय मॉडेल बदलले आहे. बँकेने आपल्या एकूण कर्जापैकी किरकोळ, लघु आणि मध्यम उद्योगांना 60 टक्के कर्ज वाटप केले आहे. कॉर्पोरेट कर्जामध्ये येस बँक लहान आकाराच्या एक्सपोजरवर अधिक भर देत आहे. येस बँकेच्या खेळत्या भांडवलाचे कर्जाचे प्रमाण अधिक असून बँक फक्त चांगले रेटिंग असलेल्या कॉर्पोरेट्सनाच कर्ज सुविधा प्रदान करते.

News Title | Yes Bank Share Price NSE: YESBANK 26 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(173)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x