Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये मोठी उलाढाल होणार? शेअरवर प्रॉफिट बुकींगची टांगती तलवार, स्टॉक खरेदी करावा?

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्ससाठी 2023 हे वर्ष काहीसे निराशाजनक ठरले आहे. खासगी क्षेत्रातील येस बँकेचे शेअर्स सतत विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. किंबहुना येस बँकेत भाग भांडवल धारण करणाऱ्या काही प्रतिस्पर्धी बँका आपले शेअर्स विकू शकतात. येस बँकेच्या शेअर्सचा 3 वर्षांचा लॉक इन कालावधी पुढील आठवड्यात संपणार आहे. यावर्षी जानेवारीत येस बँकेचे शेअर्स 16 टक्क्यांनी कमजोर झाले होते. खाजगी बँकांचे शेअर्स फेब्रुवारी 2023 मध्ये फक्त एक टक्के वाढले आहेत. येस बँकेचे शेअर्स मार्चमध्ये आतापर्यंत 5 टक्के कमजोर झाले आहेत.
येस बँकेत 8 बँकांची 10000 कोटीची गुंतवणूक :
पुनर्रचना योजनेंतर्गत 2020 मध्ये येस बँकेत 8 मोठ्या बँकांनी गुंतवणूक केली होती, त्यांचा लॉक इन कालावधी 13 मार्च 2023 रोजी संपणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, फेडरल बँक, बंधन बँक, आयडीएफसी फर्स्ट, यांनी मिळून मार्च 2020 मध्ये येस बँकेला दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी संयुक्तपणे 10,000 कोटी रुपये गुंतवणूक केली होती.
येस बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्वात जास्त गुंतवणूक केली आहे. एसबीआयने येस बँकेचे शेअर्स 10 रुपये किमतीवर खरेदी केले होते. त्यावेळी एसबीआय बँकेच्या शेअर होल्डिंगचे मूल्य 7500 कोटी रुपयांपेक्षा अधिक होते. सध्याच्या किमतीनुसार स्टेट बँकेच्या 26 टक्के भाग भांडवलाचे मूल्य 12478 कोटी रुपये आहे. म्हणजेच एसबीआयने येस बँकेत गुंतवणुक करून मजबूत परतावा कमावला आहे. येस बँकेचे शेअर्स 2023 मध्ये घसरले आहेत. मागील 3 वर्षांत येस बँकेचे शेअर्स 60 टक्केपेक्षा जास्त वधारले आहेत.
विविध बँकांचे गुंतवणूक मूल्य :
ICICI बँकेने येस बँकेत 2.6 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. आणि सध्या त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1245 कोटी रुपये आहे. शेअर्स खरेदी केल्यापासून त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 66 टक्के वाढले आहेत. येस बँकेत अॅक्सिस बँकेने 1.57 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. त्यांचे एकूण मूल्य 751 कोटी रुपये आहे. IDFC फर्स्ट बँकेने येस बँकेचे 1 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत, यांचे एकूण मूल्य 479 कोटी रुपये आहे. त्याच वेळी, कोटक महिंद्रा बँकेने येस बँकेत 1.32 टक्के शेअर्स धारण केले आहेत, ज्याचे मूल्य 631 कोटी रुपये आहे. येस बँकेतील एचडीएफसी बँकेचा वाटा 3.48 टक्के असून त्याचे मूल्य 1660 कोटी रुपये आहे.
स्टॉक प्रॉफिट बुकिंगच्या मार्गावर :
येस बँकेच्या शेअर्समध्ये (Yes Bank Stock Price) विक्रीचा दबाव निर्माण झाला असून, शेअरची किंमत दररोज खाली येत आहे. लॉक इन कालावधी संपल्यानंतर येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळू शकते. तज्ज्ञांच्या मते जे गुंतवणूकदार येस बँकेचे शेअर्स खरेदी करू इच्छित आहेत, ते स्टॉक घसरल्यावर बिनधास्त खरेदी करू शकतात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Yes Bank Share Price return on investment details on 11 March 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा, 5219 टक्के परतावा देणारा शेअर मालामाल करणार - NSE: TATACONSUM
-
Jio Finance Share Price | गुंतवणूकदार तुटून पडले या शेअरवर, जिओ फायनान्शिअल शेअरबाबत अपडेट नोट करा - NSE: JIOFIN