5 November 2024 8:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
x

Zee Entertainment Enterprises Share Price | झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस कंपनीला NCLT कडून दिलासा? आज स्टॉक मध्ये तुफान तेजी, कारण?

Zee Entertainment Share Price

Zee Entertainment Enterprises Share Price | झी ग्रुपचा भाग असलेल्या ‘झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस’ कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के घसरुन 176.60 रुपयांवर आले होते. तर मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.26 टक्के वाढीसह 194.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. आज झी च्या स्टॉकमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीचे शेअर्स बाजार भांडवल 17,577.51 कोटी रुपये आहे. चला जाणून घेऊ स्टॉक वाढीचे कारण. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Zee Entertainment Enterprises Share Price | Zee Entertainment Enterprises Stock Price | BSE 505537 | NSE ZEEL)

‘झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस’ कंपनीला शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्यूनल म्हणजेच NCLAT कडून मोठा दिलासा मिळाला. खरं तर नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस विरुद्ध दाखल करण्यात आलेली दिवाळखोरी कारवाईची इंडसइंड बँकेची याचिका स्वीकारली होती. या आदेशा विरोधात झी एंटरटेनमेंट कंपनीचे एमडी पुनित गोयंका यांनी एनसीएलएटीमध्ये याचिका दाखल केली. यानंतर NCLAT च्या दोन सदस्यीय खंडपीठाने दिवाळखोरीच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे झी कंपनीच्या स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.

संपूर्ण प्रकरण सविस्तर :
सिटी नेटवर्क्स ही झी समूहाची कंपनी 89 कोटी रुपयांच्या लोन डिफॉल्ट प्रकरणाशी संबंधित आहे. सिटी नेटवर्क्स कंपनीने 89 कोटी रुपये ही रक्कम इंडसइंड बँकेला देणे होते. यासाठी झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस कंपनी हमीदार बनली होती. मात्र सिटी नेटवर्क ने ही रक्कम भरली नाही म्हणून Indusind बँकेने NCLT मध्ये Citi Networks विरुद्ध स्वतंत्र दिवाळखोरी याचिका दाखल केली. एनसीएलटीने ही दिवाळखोरीची याचिका अशा वेळी स्वीकारली जेव्हा झी एंटरटेनमेंट आणि सोनी यांचे विलीनीकरण अंतिम टप्प्यात होते. दरम्यान एनसीएलएटीकडून झी कंपनीला दिलासा मिळाला आहे. आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजने देखील झी ग्रुप कंपनीच्या नवीन फ्युचर्स अँड ऑप्शन्स सेगमेंटवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे आज हा स्टॉक जबरदस्त तेजीत पाहायला मिळत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zee Entertainment Enterprises Share Price 505537 ZEEL stock market live on 28 February 2023.

हॅशटॅग्स

#Zee Entertainment Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x