Zen Technologies Share Price | मल्टिबॅगर झेन टेक्नॉलॉजी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, सरकारचा निर्णयाने शेअर रॉकेट वेगात वाढणार
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये अर्थसंकल्पाच्या दिवशी जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली सुरू आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झेन टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 882.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि दिवसा अखेर हा स्टॉक 880.70 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
17 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीच्या शेअर्सने 912.55 रुपये ही उच्चांक किंमत स्पर्श केली होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 7,401.78 कोटी रुपये आहे. झेन टेक्नॉलॉजीज ही कंपनी ड्रोन बनवण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. आज शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी झेन टेक्नॉलॉजी स्टॉक 2.48 टक्के घसरणीसह 859 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
अंतरिम अर्थसंकल्पात भारत सरकारने, आर्थिक वर्ष 2024-25 साठी संरक्षण क्षेत्राकरता 6.21 लाख कोटी निधीची तरतूद केली आहे. मागील वर्षी ही तरतूद 5.94 लाख कोटी रुपयेची होती. सोबतच भारत सरकारने लष्करी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अंतरिम अर्थसंकल्पात भारतीय लष्कराच्या भांडवली खर्चासाठी एकूण 1.72 लाख कोटी रुपये निधी जाहीर केला आहे. या पैशाचा वापर नवीन शस्त्रे, विमाने, युद्धनौका आणि इतर लष्करी उपकरणे खरेदी करण्यासाठी केला जाईल. मागील वर्षी म्हणजे 2023-24 मध्ये लष्कराच्या भांडवली खर्चासाठी भारत सरकारने 1.62 लाख कोटी रुपये निधी जाहीर केला होता.
अर्थमंत्र्यांनी जाहीर केले की, भारतीय संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान मजबूत करण्यासाठी आणि लष्कराच्या स्वावलंबनाला अधिक मजबुती देण्यासाठी एक नवीन योजना सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे. अर्थसंकल्पीय माहितीनुसार भारतीय संरक्षण क्षेत्राला मजबूत करण्यासाठी लागणारा एकूण महसुली खर्च अंदाजे 4,39,300 कोटी रुपये आहे. यामधे निवृत्ती वेतनासाठी 1,41,205 कोटी रुपये, संरक्षण सेवांसाठी 2,82,772 कोटी रुपये आणि संरक्षण मंत्रालयासाठी 15,322 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. संरक्षण क्षेत्रातील भांडवली खर्चात, विमान आणि एरो इंजिन खरेदी करण्यासाठी 40,777 कोटी रुपये आणि अद्यावत उपकरणांसाठी 62,343 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
यासह भारतीय नौदलाच्या ताफ्याला मजबूत करण्यासाठी 23,800 कोटी रुपये आणि नेव्हल डॉकयार्ड प्रकल्पांसाठी 6,830 कोटी रुपये निधीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पात भारतीय हवाई दलासाठी सर्वात जास्त म्हणजेच 57,137.09 कोटी रुपये भांडवली खर्च केला जाईल. यामध्ये विमान आणि एरो इंजिन खरेदीसाठी 15,721 कोटी रुपये, इतर उपकरणांसाठी 36,223.13 कोटी रुपये निधी खर्च केला जाणार आहे. अंतरिम अर्थसंकल्पात भारतीय लष्करासाठी 1,92,680 कोटी रुपये महसूल खर्चाचा अंदाज देण्यात आला आहे. नौदल आणि हवाई दलासाठी अनुक्रमे 32,778 कोटी आणि 46.223 कोटी रुपये निधी वाटप करण्यात आला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Zen Technologies Share Price NSE Live 02 February 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- Money 15-15-15 Formula | तुमचं आयुष्य बदलेल हा पैसा वाढवणारा 15-15-15 चा फॉर्म्युला, धन संप्पतीत होईल वाढ - Marathi News