19 April 2025 12:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

ZF Commercial Vehicle Share Price | करोडपती शेअर! ZF कमर्शिअल व्हेईकल शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती केले, परतावा चेक करा

ZF Commercial Vehicle Share Price

ZF Commercial Vehicle Share Price | शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना झटपट करोडपती बनवले आहे. यापैकीच एक ZF कमर्शिअल व्हेईकल कंट्रोल सिस्टीम इंडिया कंपनीचे शेअर्स देखील आहेत. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घ कालीन गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स इंट्रा डेमध्ये विक्रमी उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी ZF कमर्शिअल व्हेईकल कंट्रोल सिस्टीम इंडिया कंपनीचे शेअर्स 1.79 टक्के घसरणीसह 11,250.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

जिओजित आणि बीएनपी परिबसने ZF कमर्शिअल व्हेईकल कंट्रोल सिस्टीम इंडिया कंपनीच्या शेअरवर 12586 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. ही लक्ष किंमत सध्याच्या किमतीपेक्षा 10 टक्के जास्त आहे. मागील 14 वर्षापूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य एक कोटीपेक्षा जास्त झाले आहे. 13 मार्च 2009 रोजी हा स्टॉक 107.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

मागील 14 वर्षात ZF कमर्शिअल व्हेईकल कंट्रोल सिस्टीम इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये 10508 टक्क्यांची वाढ झाली असून शेअर 11,250.00 रुपये किमतीवर पोहचला आहे. महणजेच ज्यां लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लवकर होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 14 वर्षांत करोडो रुपये झाले आहे.

मागील वर्षी 20 जून 2022 रोजी ZF कमर्शिअल व्हेईकल कंट्रोल सिस्टीम इंडिया कंपनीचे शेअर्स 6,893.25 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 11,649.90 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवर पोहचले होते.

ZF कमर्शिअल व्हेईकल कंट्रोल सिस्टीम इंडिया ही एक जर्मन कंपनी असून, ती प्रवासी आणि व्यावसायिक वाहन क्षेत्रात व्यवसाय करते. याशिवाय ही कंपनी रेल्वे, सागरी संरक्षण आणि विमान वाहतूक उद्योगांबरोबरच इतरही अनेक क्षेत्रात उद्योग करत आहे. या कंपनीची भारतीय युनिट म्हणजेच ZF इंडिया ही कंपनी तीन संयुक्त उपक्रमांसह 14 संस्थांद्वारे भारतात व्यवसाय करत आहे.

या कंपनीच्या वेबसाइट तपशीलानुसार कंपनीने भारतात 18 उत्पादन केंद्र स्थापन केले आहेत. आणि कंपनीचे प्रादेशिक मुख्यालय पुणे येथे स्थित आहे. कंपनीच्या उत्पादन श्रेणीत मुख्यतः सक्रिय – पॅसिव्ह सेफ्टी सिस्टम, स्टीयरिंग सिस्टम, क्लच सिस्टम, गिअरबॉक्सेस, एक्सेल सिस्टम, पॉवरट्रेन, चेसिस घटक यांचा समावेश होतो.

ZF कमर्शिअल व्हेईकल कंट्रोल सिस्टीम इंडिया कंपनीने जानेवारी-मार्च 2023 मध्ये 18 टक्क्यांच्या वाढीसह 101.21 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील एका वर्षात कंपनीच्या कमाईमध्ये 12 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 977.28 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. FY2023 मध्ये कंपनीने प्रत्येक 5 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरवर 13 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून 7 जुलै 2023 हा दिवस निश्चित केला आहे. आणि कंपनी 15 ऑगस्ट किंवा त्यापूर्वी गुंतवणूकदारांच्या खात्यात लाभांश जमा करेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ZF Commercial Vehicle Share Price today on 12 June 2023

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

ZF Commercial Vehicle Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या