23 February 2025 8:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Zomato Share Price | झोमॅटो स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, 100% परतावा मिळू शकतो, नवीन टार्गेट प्राईस पहा आणि खरेदी करा

Zomato Share Price

Zomato Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करून जर तुम्हाला भरघोस परतावा कमवायचा असेल तर, तुमच्याकडे संयम असणे खूप आवश्यक आहे. सध्या एक स्टॉक शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या फोकसमध्ये आला असून पुढील काळात यात जबरदस्त वाढीचे संकेत मिळत आहेत. आपण ज्या स्टॉकबद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे, ‘झोमॅटो’. या कंपनीच्या स्टॉकबाबत ब्रोकरेज फर्म उत्साही पाहायला मिळत आहेत. ब्रोकरेज फर्मच्या अंदाजानुसार या शेअरची किंमत पुढील काळात 100 रुपये पर्यंत वाढू शकते. शुक्रवार दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.49 टक्के वाढीसह 51.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Zomato Share Price | Zomato Stock Price | BSE 543320 | NSE ZOMATO)

‘झोमॅटो’ स्टॉक बाबत तज्ञांचे मत :
ब्रोकरेज फर्म ‘जेएम फायनान्शिअल’ ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, ‘झोमॅटो’ कंपनीच्या मॅनेजमेंटला विश्वास आहे की, विनामूल्य फूड डिलिव्हरी करण्याचा अल्पकालीन नकारात्मक परिणाम इतर महसूल आणि निश्चित खर्चामध्ये सुधारणा करून भरपाई करता येऊ शकतो, आणि मार्जिनमध्ये देखील सुधारणा केली जाऊ शकते. तसेच झोमॅटो कंपनीचा लॉयल्टी प्रोग्राम ‘झोमॅटो गोल्ड’ पुन्हा एकदा सुरू करण्यात आला असून त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. या प्रोग्राम अंतर्गत ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सूट दिली जाते.

‘झोमॅटो गोल्ड’ सेवा तीन महिने कालावधीसाठी 149 रुपयेमध्ये ऑफर करण्यात आली होती. या अंतर्गत ग्राहक 10 किमीच्या परिघात रेस्टॉरंटमधून अमर्यादित मोफत डिलिव्हरी सुविधा मिळवू शकतात. झोमॅटो कंपनीने नुकताच तोट्यात चाललेल्या 225 शहरांमधील ऑपरेशन्स बंद केले आहेत. ब्रोकरेज फर्म हाऊसचे म्हणणे आहे की, झोमॅटो स्टॉक दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बंपर नफा मिळवून देऊ शकतो. म्हणून तज्ञांनी या स्टॉकवर 100 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
झोमॅटो कंपनीचा IPO 2021 साली शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आला होता. कंपनीच्या IPO ची इश्यू किंमत 76 रुपये प्रति शेअर होती. झोमॅटोचा स्टॉक लिस्टिंगनंतर IPO किंमतीपेक्ष निम्म्यावर आला आहे. या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या 49 टक्के खाली ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zomato Share Price 543320 stock market live on 18 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x