25 April 2025 8:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Life Insurance Claim | पगारदारांनो, इन्शुरन्स क्लेम करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे बुडतील, कुटुंबही अडचणीत येईल
x

Zomato Share Price | झोमॅटो शेअरबाबत मोठी अपडेट, स्वस्त झालेला शेअर अल्पवधीत देईल इतका टक्के परतावा, डिटेल्स नोट करा

Zomato Share Price

Zomato Share Price | ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोबाबत तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांच्या मते जर झोमॅटो स्टॉक 5 ते 10 टक्क्यांनी घसरला तर गुंतवणूकदारांनी या घसरणीवकडे गुंतवणूकीची संधी म्हणून पाहावी.

तज्ञांच्या मते झोमॅटो कंपनीचे शेअर्स पुढील काळात 15 ते 20 टक्क्यांनी वाढू शकतात. आज सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी झोमॅटो स्टॉक 0.45 टक्के वाढीसह 111.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

झोमॅटो व्यतिरिक्त ऑटो इक्विपमेंट क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या मदरसन आणि भारत फोर्ज कंपनीच्या स्टॉकबाबत तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. या दोन्ही कंपन्या वाहन उपकरण क्षेत्रात जबरदस्त कामगिरी करत आहेत. FMCG क्षेत्रातील डी मार्ट, डाबर आणि गोदरेज कंझ्युमर या कंपन्यांच्या शेअर बाबत देखील तज्ञ उत्साही पाहायला मिळत आहेत.

तज्ज्ञांच्या मते, मार्जिनचा दबाव पुढील काळात कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. म्हणून तज्ञांनी या कंपन्यांच्या स्टॉकवर शॉर्ट टर्म ते मिड टर्म दृष्टीकोनातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

सिमेंट क्षेत्रातील कंपन्याचे शेअर्स देखील तज्ञांना आकर्षित करत आहेत. तज्ञांनी सिमेंट स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे भारत सरकार देशातील पायाभूत सुविधांच्या कामांना अधिक गती देऊ शकते. पायाभूत विकास कामात होणाऱ्या कामाचा सकारात्मक परिणाम सिमेंट क्षेत्रावरही पाहायला मिळतो. म्हणून तज्ञांनी जेके लक्ष्मी सिमेंट, जेके सिमेंट, रॅमको सिमेंट या स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zomato Share Price NSE 16 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony