14 January 2025 5:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
x

Zomato Share Price | मल्टिबॅगर झोमॅटो शेअरवर तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, स्टॉक प्राईस मोठा उच्चांक गाठणार

Zomato Share Price

Zomato Share Price | झोमॅटो स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी झोमॅटो (NSE: Zomato) कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 267 रुपये किमतीवर पोहचले होते. झोमॅटो स्टॉकमध्ये वाढ (NSE:Zomato) होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच पेटीएम कंपनीने आपला चित्रपट तिकीट व्यवसाय झोमॅटो कंपनीला 2,048 कोटी रुपयेला विकण्याची घोषणा केली आहे. ( झोमॅटो कंपनी अंश )

चित्रपटांव्यतिरिक्त, या डीलमध्ये मनोरंजन तिकीट व्यवसाय, क्रीडा कार्यक्रम आणि मैफिलींचे तिकिट असे काही व्यवसाय सामील असतील. आज शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी झोमॅटो स्टॉक 2.14 टक्के वाढीसह 263.48 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

झोमॅटो कंपनीला चित्रपट तिकीट व्यवसाय विकण्यात आला असला तरी पुढील 12 महिने चित्रपटांची तिकिटे पेटीएम ॲपवरच बुक करता येतील. Paytm ने या संदर्भात झोमॅटोसोबत पक्का करार केला असल्याची माहिती दिली आहे. या डीलचे मूल्य 2,048 कोटी रुपये आहे. या करारानंतर झोमॅटो कंपनीच्या व्यवसायाची व्याप्ती आणखी वाढणार आहे. आत्तापर्यंत झोमॅटो कंपनी फक्त ऑनलाईन अन्न पुरवठ्याशी संबंधित प्लॅटफॉर्म होता. मात्र आता या प्लॅटफॉर्मवर फिल्म शोची तिकिटे बुक करण्याचा व्यवसायही सुरू होणार आहे.

जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजने झोमॅटो स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 335 रुपये किमतीवर जाऊ शकतो. CLSA फर्मने या स्टॉकवर 350 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. पेटीएमच्या तिकीट व्यवसाय अधिग्रहणाचे मूल्यांकन खूप आकर्षक वाटत आहे. बर्नस्टीन फर्मने झोमॅटो स्टॉकवर प्रति शेअर 275 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

2024 या वर्षात झोमॅटो स्टॉक 110 टक्के वाढला आहे. मागील 12 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 183 टक्के परतावा कमावून दिला आहे. एका वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत 90 रुपये होती. झोमॅटो कंपनीचा IPO 2021 मध्ये 76 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता.

News Title | Zomato Share Price NSE: Zomato 23 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x