Zomato Share Price | झोमॅटोच्या स्टॉकमध्ये म्युच्युअल फंडांनी 11 कोटी शेअर्स विकत घेतले, तज्ञांनी स्टॉकमध्ये तेजी येण्याचा अंदाज वर्तवला
Zomato Share price| म्युच्युअल फंडांनी झोमॅटोचे 11 कोटींहून अधिक शेअर्स खरेदी केल्याची बातमी शेअर बाजारात येताच, गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. भारतातील दोन दिग्गज म्युच्युअल फंड हाऊस ज्यांनी झोमॅटो कंपनीचे स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहेत. मागील ट्रेडिंग सेशनमध्ये zomato च्या शेअरमध्ये 4.80 वाढ पाहायला मिळाली होती आणि, स्टॉक प्रती शेअर किंमत 65.55 रुपयांवर ट्रेड करत आहे.
झोमॅटो स्टॉकची किंमत :
जुलै महिन्यात झोमॅटो शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणत खरेदी केल्यानंतर, म्युच्युअल फंड व्यवस्थापकांनी ऑगस्टमध्ये स्टॉकमधील गुंतवणुकीवर भाष्य केले. त्यांच्या मते या स्टॉकमध्ये प्रचंड प्रमाणत वाढीची शक्यता आहे. या दोन दिग्गज म्युच्युअल फंड हाऊस नी जून महिन्यात zomato कंपनीचे 11 कोटींहून अधिक शेअर्स खरेदी करून खूप मोठी गुंतवणूक केली आहे. 11 कोटी शेअरच्या व्यवहारात झोमॅटो शेअर्सचा व्यवहार करणाऱ्या 20 बड्या फंड हाऊसेसपैकी 12 फंड हाऊस नी आपले शेअर विकले,तर बाकीच्या फंड हाऊस नी या संधीचा फायदा घेतला आणि सर्व शेअर खरेदी केले. या सर्व खरेदीदार म्युच्युअल फंडांनी 11 कोटींहून अधिक शेअर्स खरेदी करून कंपनीमध्ये खूप मोठी गुंतवणूक केली आहे. या व्यवहारात दोन दिग्गज म्युच्युअल फंड हाऊस आहेत, ज्यांनी मोठ्या प्रमाणात झोमॅटो स्टॉकवर बोली लावली होती. इतक्या मोठ्या प्रमाणत व्यवहार झाल्यावर कंपनीच्या शेअरमध्ये 4.80 टक्के वाढ झाली आणि शेअर दिवसा अखेर 65.55 रुपये किमतीवर बंद झाला.
कोणत्या फंड हाऊस ने किती शेअर खरेदी केले?
मिरे असेट फंड हाऊस ने Zomato कंपनीचे 9.47 कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. तर फ्रँकलिन टेम्पलटन या प्रसिद्ध म्युचुअल फंड हाऊसने 1.18 कोटी शेअरमध्ये पैसे गुंतवणूक केली आहे. इतर म्युचुअल फंड हाऊस जसे ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड, मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड, UTI म्युच्युअल फंड यांनीही झोमॅटोचे शेअर मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहेत. ईस्ट इंडिया सिक्युरिटीज कंपनीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार मोठ्या इक्विटी म्युच्युअल फंडांनी ऑगस्ट महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सारख्या ब्लूचिप स्टॉकमधून विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) मोठ्या प्रमाणात केलेल्या विक्रीमुळे त्यांनीही आपली गुंतवणूक कमी केली आहे.
झोमॅटोमध्ये गुंतवणूक का केली ?
या सर्व म्युचुअल फंड हाऊसनी zomato चे शेअर घेऊन कंपनीवर खूप मोठा विश्वास दाखवला आहे. कंपनीचे आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोन सकारात्मक आहे, आणि कंपनीच्या महसुलात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. zomato चा फूड डिलिव्हरी व्यवसाय एबिटा स्तरावर ब्रेक-इव्हन झाला आहे. शेअर बाजार तज्ञ देखील गुंतवणूकदारांना स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. कोटक सिक्युरिटीज आणि जेफरीज इनकॉर्पोरेटेडने zomato शेअर्सच्या बाबतीत सुधारित लक्ष किंमत जाहीर केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Zomato share price returns after Mutual fund houses invested in stock on 14 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल