21 April 2025 2:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

Zomato Share Price Today | 'झोमॅटो' कंपनीने दिलेल्या प्रतिक्रियेनंतर शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिली ही टार्गेट प्राईस, जोरदार स्टॉक खरेदी

Zomato Share Price

Zomato Share Price Today | ‘झोमॅटो’ या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची चढ उतार पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 54.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअर्समध्ये ही तेजी एका घोषणेच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळाली होती. आज गुरूवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी ‘झोमॅटो’ कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के घसरणीसह 53.90 रुपये किमतीवर ट्रेड मार्ग आहे. झोमॅटो कंपनीने बुधवारी जाहीर केले की,’ ब्लिंकिट’ कंपनीच्या वादाचा ‘झोमॅटो’ कंपनीच्या महसुलावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. ही माहिती ‘झोमॅटो’ कंपनीने अनेक ब्लिकिट स्टोअर्स बंद केल्यानंतर दिले आहे. (Zomato Limited)

ब्लिंकिट कंपनीचा वाद :
ब्लिंकिट कंपनीच्या डिलिव्हरी पार्टनर्सने आरोप केला आहे की, ब्लिंकिट कंपनीने त्यांच्या वेतनात बदल केला आहे. या बदलामुळे डिलिव्हरी पार्टनरच्या कमाईवर नकारात्मक परिणाम होणार आहे. डिलिव्हरी पार्टनर्सच्या म्हणण्यानुसार, त्यांना डिलिव्हरी केलेल्या ऑर्डरवर 50 रुपये मिळत होते. मागील वर्षी यात कपात करून 25 रुपये करण्यात आले. आता पुन्हा त्यात बदल करण्याचा विचार सुरू आहे. डिलिव्हरी पार्टनर्सचे म्हणणे आहे की नवीन वेतन बदलामुळे त्यांना प्रति ऑर्डर फक्त 12-15 रुपये वेतन मिळेल. डिलिव्हरी पार्टनर वेतनातील या नकारात्मक बदलाला जोरदार विरोध दर्शवत आहेत.

मागील काही दिवसांपासून ब्लिंकिट कंपनीचे डिलीव्हरी पार्टनर संप आंदोलन करत आहेत. अशा परिस्थितीत दिल्ली- एनसीआरमधील ब्लिंकिटचे स्टोअर्स बंद करण्यात आले आहे. ब्लिंकिट कंपनी दिल्ली-एनसीआरमध्ये खूप लोकप्रिय मानली जाते. कंपनीने आपल्या ग्राहकांना 10 मिनिटांत रेशन, डेअरी, फळे, भाज्या, डिलिव्हरी करते.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘झोमॅटो’ कंपनीचा IPO 2021 शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO शेअरची किंमत 76 रुपये होती. झोमॅटो कंपनीच्या स्टॉकबाबत ब्रोकरेज फर्म सकारात्मक असून त्यांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मने ‘झोमॅटो’ कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक 70 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

भारताचा फूड डिलिव्हरी उद्योग पुढील काळात वेगाने वाढेल आणि इंटरनेटचा वाढता वापर, शहरीकरण यामुळे ‘झोमॅटो’ सारख्या कंपन्यांना खूप फायदा होईल. Amazon कंपनी फूड डिलिव्हरी मार्केटमधून बाहेर पडल्यानंतर झोमॅटो कंपनीने 55 टक्के बाजार काबीज केला आणि स्विगीने 45 टक्के बाजार काबीज केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zomato Share Price Today on 20 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या