23 January 2025 9:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

Zomato Share Price | झोमॅटो शेअरने सहा महिन्यात 70.75 टक्के परतावा दिला, शेअरमधून जबरदस्त कमाई होतेय, खरेदी करणार?

Zomato Share Price

Zomato Share Price | ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झोमॅटो कंपनीचे शेअर 86.86 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 6 दिवसांपासून झोमॅटो कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये अल्पावधीत 11 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

सध्या झोमॅटो कंपनीचे शेअर्स 15 महिन्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षात झोमॅटो कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. अवघ्या एका वर्षात या स्टॉकने लोकांचे पैसे दुप्पट केले आहे. आज सोमवार दिनांक 31 जुलै 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 2.07 टक्के घसरणीसह 85.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गुंतवणुकीवर परतावा :

28 जुलै 2022 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 43.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 28 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 86.86 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील एका वर्षात झोमॅटो कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही एक वर्षभरापूर्वी झोमॅटो कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.01 लाख रुपये झाले असते.

मागील 6 महिन्यांत झोमॅटो कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 70.85 टक्के नफा कमावून दिला आहे. 30 जानेवारी 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 47.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 28 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 86.86 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 40.96 टक्के नफा कमावून दिला आहे.

शेअरची कामगिरी :

झोमॅटो कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 87.27 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 43.05 रुपये होती. झोमॅटो कंपनीने आपला IPO स्टॉक 76 रुपये किमतीवर वाटप केला होता. Zomato कंपनीचा IPO जुलै 2021 मध्ये शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 72-76 रुपये जाहीर करण्यात आली होती. तर स्टॉक 76 रुपये किमतीवर वाटप करण्यात आले होते. झोमॅटो कंपनीचे शेअर्स लिस्टिंगच्या दिवशी 115 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या IPO चा एकूण आकार 9375 कोटी रुपये होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zomato Share Price today on 31 July 2023.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x