23 January 2025 9:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

Stock In Focus | स्वस्तात मस्त शेअर मिळतोय भारी डिस्काउंटवर, स्टॉकवर 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो, नाव सेव्ह करा

Stock In Focus

Stock In Focus | ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी Zomato च्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव दिसून येत आहे. हा स्टॉक आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीच्या 65 टक्के खाली ट्रेड करत आहेत. त्याच वेळी, Zomato चा IPO जेव्हा सूचीबद्ध झाला होता तोही निश्चित किंमतीपेक्षा 20 टक्क्यांनी खाली ट्रेड करत होता. ब्रोकरेज हाऊस MK Global ने Zomato चा स्टॉक खरेदी करण्याची योग्य संधी असल्याचे म्हंटले आहे. ब्रोकरेज हाऊसने अंदाज व्यक्त केला आहे की, zomato स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास पुढील काळात त्यात 55 टक्के परतावा मिळू शकतो. लोकांच्या उत्पन्नात वाढ झाल्यास ऑनलाइन खाद्यपदार्थांचा बाजार आणखी वाढेल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. जर खाद्यपदार्थांचा बाजार वाढला तर या सकारात्मक परिस्थितीत zomato ला आघाडीच्या कंपन्यांमध्ये सामील होण्याची संधी मिळेल.

90 रुपये लक्ष किंमत :
ब्रोकरेज हाऊस MK Global ने Zomato स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला असून त्याची लक्ष किंमत 90 रुपये निश्चित केली आहे. सध्या ZOMATO चा स्टॉक 58 रुपये किंमतीवर ट्रेड करत आहे. पुढील काळात हा स्टॉक 55 टक्के परतावा देऊ शकतो असा अंदाज ब्रोकरेज हाऊसने व्यक्त केला आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी मार्केट पुढील दशकापर्यंत 7 पटीने वाढू शकतो. भारतात ज्या प्रकारे लोकांचे उत्पन्न वाढत आहे ऑनलाइन ॲपचा वापर आणि त्यांची उपलब्धताही वाढत आहे. खाण्यापिण्याचे व्यवहार, आणि प्रकार बदलत आहेत. याचा फायदा ऑनलाइन फूड मार्केटला होत आहे. जर कंपनीनं योग्य वेळी संधीचा फायदा घेतला तर ZOMATO कंपनी ऑनलाईन फूड मार्केट मध्ये एक मोठी खेळाडू बनू शकते.

बाजारातील मजबूत स्थितीचा फायदा :
Zomato कंपनीने ऑनलाईन फूड बाजारपेठेतील मोठा हिस्सा ताब्यात घेतला आहे. त्याच वेळी, शेअर बाजारातील मजबूत स्थितीमुळे ऑनलाईन फूड क्षेत्रातील वाढत्या शक्यतांचा फायदा Zomato कंपनीला भेटू शकतो. Zomato हा ऑनलाईन फूड मार्केटमध्ये एक खूप मोठा ब्रँड म्हणून नावारूपाला आला आहे. तथापि, ह्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याचे काही जोखीम घटकही आहेत. Zomato अजूनही तोट्यात आहे, भांडवलाची कमतरता,आणि क्विक कॉमर्समधील वाढती स्पर्धा हे जोखीम घटक zomato च्या सामोरे अडथळा म्हणून उभे आहेत.

उच्चांक किमतीपेक्षा 65 टक्के खाली :
23 जुलै 2021 रोजी Zomato चा शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. या स्टॉकची इश्यूची किंमत 76 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. सुरवातीला Zomato चा स्टॉक 115 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला आणि त्यानंतर सातत्याने घसरत चालला आहे. फक्त लिस्टिंगच्या दिवशी Zomato चा स्टॉक 66 टक्क्यांनी वाढला होता,त्यानंतर स्टॉक इतका पडला की आता त्याची किंमत फक्त 60 रुपयांच्या आसपास राहिली आहे. Zomato च्या स्टॉक ने सुरुवातीला 169 रुपयांची विक्रमी किंमत स्पर्श केली होती, पण सध्या हा स्टॉक आपल्या उच्चांकी किमतीच्या 65 टक्के खाली ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Zomato Stock In Focus and advised to add in portfolio by Share market expert on 30 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x