17 April 2025 10:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Digital Gold | तुम्ही ज्वेलर कडून सोनं खरेदी करणार की डिजिटल गोल्ड? डिजिटल गोल्डचे फायदे आणि तोटे जाणून घ्या

Digital Gold

Digital Gold | ऑनलाईन खरेदी विक्री आता खुप जास्त वाढत चालली आहे. यात सर्वच वस्तूंचा समावेश होत आहे. आजवर व्यक्ती ऑनलाइन पध्दतीने कपडे, वस्तू, अन्न अशा गोष्टी खरेदी करत होते. मात्र आता अनेक व्यक्ती चक्क सोने देखील ऑनलाइन पध्दतीने विकत घेत आहेत.

दिवाळी सणाला आपल्या देशात फार महत्व आहे. सर्वच जण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. यात धनत्रयोदशी आली की सर्व जण सोनाराच्या दुकानात गर्दी करतात. धनत्रयोदशीला सोनं खरेदीची जणू काही परंपराच झाली आहे. आधी सोनं म्हणजे स्त्री धन मानलं जातं होतं. मात्र आता अनेक स्त्रीया सोन्याचे दागीने घेण्यापेक्षा हि-यांच्या दागिण्यांकडे आकर्शित होतात. त्यामुळे सोने खरेदी करताना अनेक व्यक्ती ही एक इन्वेस्टमेंट आहे असे समजतात.

आता तुम्ही देखील यंदाच्या धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणार असाल तर तुम्ही डिजिटल गोल्डचा विचार करू शकता. यात बराच फायदा आहे. म्हणजे यात घेतलेलं सोन हे फिजीकली तुमच्याकडे नसते मात्र डिजिटली तुम्ही ते वापरू शकता. भविष्यात गरज पडेल तेव्हा त्याचे दागीने बनवू शकता. मात्र हे खरेदी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहीजे.

डिजिटल क्रांतीमुळे आजवर सेफगोल्ड, एमएमटीसी-पॅम्प आणि ऑगमाँट या कंपन्या ही सेवा पुरवत होत्या. या कंपन्या सरकारमान्य आहेत. मात्र आता अनेक सोनार देखील आपले स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्म बनवत आहेत. यात थर्ड पार्टीचा तुमच्या गुंतवणूकीवर अधिकार असतो. हे डिजिटल सोन तुम्ही ठरावीक फी भरून तुमच्या तिजोरीत देखील ठेवू शकता.

सोनाराकडून जेव्हा आपण असे सोन खरेदी करतो तेव्हा त्याची पूर्ण माहिती मिळत नाही. खरोखर आपण दिलेल्या पैशांच सोन खरेदी केलं आहे की, ते पैसे एका ठिकाणी साठवून ठेवले आहेत या बाबत मनात शंका असते. यात सराफांकडे सुरू असलेली सेवा डिजिटल करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे यात तुम्ही थोडे थोडे पैसे गुंतवून सोनं खरेदी करू शकता. हे संपूर्ण काम एसआयपी प्रमाणे लवकरच सुरू होत आहे.

सोनार या विषयी काय सांगतात
यात सोनार देखील सांगतात की, तुम्ही गुंतवलेले पैसे परदेशी पाकिटात जमा होतात. त्यामुळे यावर लागणारा आयात खर्च वाचतो. पण तुम्हाला हे सोनं तुमच्या हातात पाहिजे असेल तेव्हा काय करावे असा प्रश्न पडतो. सेबीने ऑगस्ट २०२१ मध्येच या सेवेवर बंदी आणली आहे. असे सोनं खरेदी करणे म्हणजे क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणूक करणे. त्यामुळे सोनं खरेदी करताना तुमच्या बचती मधूनच खरेदी करणे हिताचे आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Digital Gold Advantages and Disadvantages check details 21 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Digital gold(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या