Gold and Silver Price | सोन्या-चांदीची चमक वाढली | पाहा आजचा मुंबई आणि इतर शहरातील दर
Gold and Silver Price | रुपयातील सततच्या घसरणीमुळे शुक्रवार, २० मे रोजी देशांतर्गत बाजारात सोन्याची चमक आणखी वाढली. सोन्याच्या दरात आज तब्बल २३१ रुपये प्रति दहा ग्रॅमची वाढ झाली. या तेजीमुळे दिल्ली सराफा बाजारात सोने 50,608 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषकांनी (कमोडिटीज) ही माहिती दिली. याआधीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोनं 50,377 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झालं होतं. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ७ पैशांनी घसरला आणि ७७.६३ प्रति डॉलरवर बंद झाला. रुपयाची ही आतापर्यंतची नीचांकी पातळी आहे.
The continued fall in the rupee further increased the shine of gold in the domestic market on Friday, May 20. Gold prices rose by a whopping Rs 231 per ten grams today :
चांदीचे दरही वाढले :
सोन्याबरोबरच दिल्ली सराफा बाजारातही चांदीच्या दरात आज वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. चांदी 585 रुपयांनी वाढून 61,657 रुपये प्रति किलो झाली आहे. याआधीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये चांदी 61,072 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.
मुंबई बाजारात सोन्या-चांदीचे दर :
मुंबई सराफा बाजारात स्टँडर्ड सोने (९९.५) प्रति दहा ग्रॅम ५०,८२३ रुपयांवर बंद झाले, तर शुद्ध सोने (९९.९) ५१,०२७ रुपयांवर बंद झाले. मुंबईत चांदी 62,004 रुपये प्रति किलोवर बंद झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे दर :
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 1,845 डॉलरवर, तर चांदी जवळपास 21.92 डॉलर प्रति औंसवर स्थिर होती. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, शुक्रवारी न्यूयॉर्कस्थित कमॉडिटी एक्सचेंज कॉमेक्सवर सोन्याची स्पॉट प्राइस ०.२३ टक्क्यांनी वाढून १,८४५ डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत होती, ज्यामुळे त्याचे भाव मजबूत झाले.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Gold and Silver Price check details here 21 May 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO
- Monthly Pension Scheme | पैसे असे गुंतवा की, प्रत्येक महिन्याला 12,000 हातामध्ये येतील, 'या' खास योजनेबद्दल जाणून घ्या
- Dhananjay Powar | बिग बॉस फेम धनंजय पोवार देतोय बिग बॉसमध्ये जाण्यासाठी ट्रेनिंग, गमतीशीर व्हिडिओ झालाय व्हायरल