Gold Investment Options | सोन्यात करा डिजिटल स्वरूपात गुंतवणूक, 4 जबरदस्त पर्याय लक्षात ठेवा आणि सणासुदीत गुंतवणूक करा

Gold Investment Options| भारत हा सणाचा देश मानला जातो. भारतात कोणताही सण असो, सोने खरेदी हा भारतीयांचा आवडता छंद आहे. दसरा, धनत्रयोदशी आणि दिवाळी यांसारख्या सणांमध्ये भारतीय लोक भरघोस सोने खरेदी करतात. कारण भारतात या सणाच्या काळात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. पारंपारिकपणे, लोक फक्त सोन्याचे दागिने आणि नाणी खरेदी करताना दिसतात. पण आता लोकांनी डिजिटल स्वरूपातही सोने खरेदी करायला सुरुवात केली आहे. आजकाल लोक डिजिटल गोल्ड खरेदी करतात उदाहरणार्थ गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे गोल्ड ईटीएफ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेले सुवर्ण रोखे याला आपण एसजीबी म्हणतो, त्यासोबत गोल्ड म्युच्युअल फंडही. गोल्ड पेपर बॉण्ड्स किंवा डिजिटल सोने गुंतवणुकीच्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक मानले जाते. या गुंतवणुकीतून चांगला लोकांनी चांगला परतावाही कमावला आहे. सोने खरेदी आयकर भरताना भांडवली मालमत्ता म्हणून वर्गीकृत केली जाते.
सोने ETF गोल्ड ईटीएफ :
गोल्ड ETF द्वारे तुम्ही सोन्यात डिमटेरियलाइज्ड स्वरूपात गुंतवणूक करू शकता. हे गोल्ड ETF स्टॉक एक्स्चेंजवर इक्विटी स्टॉक्सप्रमाणेच खरेदी आणि विक्री केले जातात. खरेदीदाराच्या डिमॅट खात्यात डिजिटल स्वरूपात हे सोने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जमा केले जाते. गोल्ड ETF स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध असतात,तिथे त्यांच्या किमतींबद्दल रिअल-टाइम अपडेट आपण पाहू शकतो. ईटीएफमध्ये कोणताही एक्झिट लोड नसतो, याचा अर्थ गुंतवणूकदार बाजाराच्या ट्रेडिंग वेळेत कधीही आपले गोल्ड युनिट्स खरेदी किंवा विक्री करू शकतो.
गोल्ड म्युच्युअल फंड :
गोल्ड म्युच्युअल फंड हे ओपन-एंडेड फंड असतात, जे गुंतवणूकदारांना डिमॅट अकाउंटशिवाय गुंतवणूक करण्याची मुभा देतात. गोल्ड म्युचुअल फंड युनिट्स नेट अॅसेट व्हॅल्यू म्हणजेच NAV च्या आधारावर ठरवले जातात. हे ट्रेडिंग वेळेच्या शेवटी खुले केले जातत. या गोल्ड म्युचुअल फंडमध्ये तज्ञ पैसे कमवण्यासाठी आणि जोखीम कमी करण्यासाठी हमखास गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात.
गोल्ड फंड ऑफ फंड्स/ एफओएफ :
गोल्ड फंड ऑफ फंड्स हे असे गुंतवणूक फंड आहेत जे म्युच्युअल फंडाच्या बास्केटमध्ये पैसे गुंतवतात. हे गोल्ड फंड सोन्याच्या चढ उताराच्या अधीन असल्यामुळे सोन्याच्या किमतीचा ह्या फंड मधील परताव्यावर परिणाम होतो. सोन्यात गुंतवणूक करणे चांगले मानले जाते, कारण यामध्ये सुरक्षितता, लिक्विडीटी, भरघोस परतावा मिळवता येतो.
सॉवरेन गोल्ड बॉन्ड/SGB :
SGB ही सरकारी गोल्ड सिक्युरिटीज आहेत, जे सोन्याच्या ग्रॅममध्ये डिनोमिनेटेड आहेत. सोने भौतिकरित्या जमा करून ठेवणे सर्वांना शक्य होत, त्याला SGB एक उत्तम पर्याय आहे. गुंतवणूकदारांनी SGB इश्यूची किंमत रोखीने भरणे आवश्यक असते. आणि गोल्ड बाँड मुदतपूर्तीच्या वेळी रिडीम केले जातात. विशेषत: 5 ते 8 वर्षे दीर्घ गुंतवणूकीचे लक्ष असलेल्या लोकांसाठी गोल्ड बाँड हा एक सुरक्षित गुंतवणुकीचा मार्ग मानला जातो. गोल्ड बाँड रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे जारी केले जातात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वर्षात बऱ्याच वेळा SGB जारी करून पैसे उभारत असते. RBI गोल्ड बाँड इश्यूसाठी किंमत निश्चित करत असते. गुंतवणूकदार दुय्यम बाजारातूनही SGB खरेदी किंवा विक्री करू शकतात. गोल्ड बॉण्ड्स गुंतवणुकीच्या रकमेवर वार्षिक 2.50 टक्के निश्चित दराने व्याज परतावा दिला जातो. हे व्याज गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात दर सहा महिन्यानी जमा केले जाते, आणि अंतिम व्याज मुदतपूर्ती झाल्यावर मुद्दलासह एकत्रित पणे दिले जाते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Gold Investment options for Investment and to earn great return on 23 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA