14 January 2025 5:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
x

Gold Investment | लग्नासाठी सोनं खरेदी करताय? मग या गोष्टी तपासा आणि फसवणूकीपासून वाचा

Gold Investment

Gold Investment | नुकतेच घरोघरी तुळशीचे लग्न लागले. त्यामुळे आता लग्न सराइला सुरुवात झाली आहे. लग्न ठरल्यावर सर्वचजण खरेदीला लागतात. यात कपडे, दागीने, हॉल, जेवण अशा विविध गोष्टींची यादी तयार केली जाते. लग्नात गरिब असो वा श्रिमंत सर्वच जण आकर्शक दागीने नवरीसाठी खरेदी करतात. कारण लग्नात अनेक व्यक्ती खास नवरी आणी तिचे दागीने पाहण्यासाठी येत असतात.

अशात दागिने खरेदी करताना आपला बजेट ठरवावा लागतो. त्यानुसार दागिन्यांची निवड करावी लागते. यात तुम्हाला छान डिजाइन पाहीजे असेल तर त्यानुसार त्याचे पैसे द्यावे लागतात. त्यामुळे अनेक व्यक्ती सोनाराकडे आधीच भिशी लावतात आणि त्या खर्चातून दागिने बनवून घेतात. तुम्ही देखील आता लग्नाच्या गडबडीत दागिने खरेदी करत आहात तर तुम्हाला या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

आधि तुमचे बजेट निश्चित करा
लग्नात विविध गोष्टींवर खर्च करावा लागतो. त्यामुळे आधिच सगळ्याचे बजेट निश्चित असने गरजेचे आहे. यात तुम्ही दागिन्यांवर किती खर्च करु शकता हे आधीच ठरवले असेल तर त्यानुसार तुम्हाला दागिन्यांची निवड करता येते. याने तुमच्या बाकिच्या वस्तू खरेदी करताना पैशांची अडचण येत नाही.

सोन्याचा भाव लक्षात घ्या
सोने खरेदी करताना अजिबात घाई करु नका. अनेक सोनार आपले सोने विकले जावे म्हणून आपल्याला विविध गोष्टी सांगतात. मात्र सोन्याचे दागिने हे आपण सारखेसारखे बनवत नाही त्यामुळे तुम्हाला सुट होतील तेच दागिने खरेदी करा. तसेच आधिच सोन्याचा भाव तपासा. असे केल्याने तुम्ही सोनाराकडे योग्य ती वाटाघाटी करु शकता. तसेचस कोणताही सोनार तुमच्याकडून जास्तीचे पैसे घेत असेल तर तुम्हाला ते पटकन लक्षात येइल.

हॉलमार्कचे दागीने खरेदी करा
आजकाल अनेक व्यक्ती हॉलमार्कचे दागिने खरेदी करतात. यात तुम्हाला तुमच्या सोन्याची शुध्दता समजते. जेव्हा तुम्ही असे दागिने खरेदी करता तेव्हा हॉलमार्कचे त्यावर चिन्ह अथवा दोन अंकी किंवा अक्षरी कोड असतो. तो निट तपासावा. त्याने तुम्हाला सोन्याची शुध्दता समजते. तसेच तुमच्या दागीन्यातील सोन्याच्या प्रमाणाचे सर्टिफीकेट घ्या. जर दागिन्यावर हिरे असतील तर त्याचे वेगळे सर्टिफीकेट मिळते. ते सुध्दा घ्या. कारण भविष्यात दागिने वाढवताना याची गरज पडते.

पक्क बिल नक्की घ्या
दागिने खरेदी केल्यावर सोनाराकडून पक्के बिल आवश्य घ्या. यावर किती मजूरी, सोन्याचा भाव किती आणि तारीख या सर्व गोष्टी नमुद असतात. असे केल्याने तुमची फसवणूक होत नाही. जर सोनार तुम्हाला पक्के बिल देत नसेल तर त्याचे दागिने खरेदी करु नका. सोने खरेदी वेळी अशी काळजी घेतल्यास तुमची फसवणूक होणार नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Investment When buying wedding rings check these things and avoid scams 07 November 2022.

हॅशटॅग्स

#Gold Investment(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x