
Gold Price Today | देशातील सराफा बाजारात आज सोने आणि चांदी या दोन्हींच्या किंमतीत लक्षणीय घट पाहायला मिळाली आहे. राजधानी दिल्लीत सोन्याचे दर 261 रुपयांनी कमी झाले, तर चांदीमध्ये 692 रुपयांची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोने-चांदीचे दर कमकुवत राहिले. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.
सोने-चांदीचे दर
एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, शुक्रवार, 14 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 261 रुपयांनी घसरून 51,098 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. याआधीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तो 51,359 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. दिल्लीत चांदीच्या दरातही आज घसरण झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, शुक्रवारी चांदीचे दर 692 रुपयांनी घसरून 57,477 रुपये प्रति किलोवर बंद झाले, जे मागील व्यापार सत्रात 58,169 रुपये प्रति किलो होते.
सोने खरेदी करणाऱ्यांना दिलासा
गुंतवणुकीसाठी सोने सर्वात सुरक्षित मानले जाते. तसेच दीर्घकालीन गुंतवणुकीत चांगला नफा मिळतो. या सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने होणारी घसरण ही खरेदी करावी लागणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,665.2 डॉलर प्रति औंस तर चांदी 18.95 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत होती. उत्पादनातील वाढ आणि डॉलरच्या किमतीतील तेजी यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतींवरील ताण वाढत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे रिसर्च अॅनालिस्ट दिलीप परमार यांनी सांगितले. परमार म्हणाले की, सतत वाढणारी महागाई आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह, सेंट्रल बँक ऑफ अमेरिका यांनी व्याजदरात अचानक केलेली वाढ यामुळे कॉमेक्समध्ये (कॉमेक्स) साप्ताहिक आधारावर सोन्याचे दर घसरणीकडे वाटचाल करत आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.





























