20 April 2025 6:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जोरदार धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या

Highlights:

  • Gold Price Today
  • सोन्याचे दर किती रुपयांवर जाणार?
  • सराफा बाजारात सोन्याचा दर किती कोसळला
  • एमसीएक्सवर सोन्या-चांदीत घसरण
  • तुमच्या शहरातील आजचे दर किती झाले?
Gold Price Today

Gold Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात झालेली वाढ सोमवारी संपुष्टात आली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये मोठी घसरण झाली. यानंतर अलीकडे दागिने खरेदी करण्याचा बेत आखणाऱ्या ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. सराफा बाजारात सोन्याचे दर ६०,००० रुपयांच्या खाली तर चांदीचे दर ७२,००० रुपयांच्या खाली घसरले. मात्र, गेल्या आठवड्यात चांदीतही घसरण झाली होती.

सोन्याचे दर किती रुपयांवर जाणार?

मे महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या प्रचंड वाढीचा ट्रेंड कायम राहिला आणि तो 61739 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. त्याचप्रमाणे चांदीने ७७ हजारांचा टप्पा ओलांडून विक्रम प्रस्थापित केला होता. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) आणि सराफा बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. दरात सध्या घसरण पाहायला मिळत असली तरी दिवाळीच्या मुहूर्तावर सोने ६५ हजाररुपयांचा टप्पा गाठू शकते, असा तज्ज्ञांचा दावा आहे. त्याचप्रमाणे चांदीचा भाव प्रतिकिलो ८० हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

सराफा बाजारात सोन्याचा दर किती कोसळला

सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात घसरण झाली. सोमवारी सोन्याचा भाव 707 रुपयांनी घसरून 59,601 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदी 935 रुपयांनी घसरून 71,423 रुपये प्रति किलोग्राम झाली आहे. यापूर्वी शुक्रवारी चांदी 72358 रुपये आणि सोनं 60308 रुपये प्रति 10 ग्राम वर पोहोचली आहे.

एमसीएक्सवर सोन्या-चांदीत घसरण

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. एमसीएक्सवर आठवड्याच्या पहिल्या व्यवहारात सोने २४४ रुपयांनी घसरून ५९३६४ रुपयांवर आले. तर चांदी485 रुपयांच्या घसरणीसह 71535 रुपयांवर ट्रेंड करत आहे. याआधी शुक्रवारी सोने 59608 रुपये आणि चांदी 72020 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

तुमच्या शहरातील आजचे दर किती झाले?

* औरंगाबाद, २२ कॅरेट सोने : ५५३०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०३३० रुपये
* भिवंडी, २२ कॅरेट सोने : ५५३६० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०३६० रुपये
* कोल्हापूर, २२ कॅरेट सोने : ५५३०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०३३० रुपये
* लातूर, २२ कॅरेट सोने : ५५३६० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०३६० रुपये
* मुंबई, 22 कॅरेट सोने : 55300 रुपये, 24 कॅरेट सोने : 60330 रुपये
* नागपूर, २२ कॅरेट सोने : ५५३०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०३३० रुपये
* नाशिक, २२ कॅरेट सोने : ५५३६० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०३६० रुपये
* पुणे, २२ कॅरेट सोने : ५५३०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०३३० रुपये
* सोलापूर, २२ कॅरेट सोने : ५५३०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०३३० रुपये
* वसई-विरार, २२ कॅरेट सोने : ५५३६० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०३६० रुपये

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Price Today Updates check details on 05 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या