22 January 2025 6:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN
x

Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जोरदार धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | सोने-चांदीच्या सततच्या घसरणीमुळे लोक खरेदी करण्यापूर्वी बराच विचार करत आहेत. यामुळेच लग्नसराईच्या हंगामातही दागिन्यांच्या विक्रीला वेग येऊ शकला नाही. पण जर तुम्हीही सोन्या-चांदीचे दर कमी होण्याची वाट पाहत असाल तर आजचा दिवस तुमचा आहे. कारण, सराफा बाजार आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. सोन्या-चांदीच्या दरात बराच काळ चढ-उतार सुरूच आहे.

दर घसरल्याने सराफा बाजारात लगबग
आता सोने-चांदी स्वस्त झाल्याने दागिने खरेदीचा विचार करणाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. मात्र यंदाच्या दिवाळीत सोन्याचा दर 65,000 रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत जाईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे चांदीचा भाव प्रतिकिलो 80,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सोमवारी प्रमुख सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजची (एमसीएक्स) हीच स्थिती होती.

सराफा बाजारात दरात मोठी घसरण
इंडिया बुलियर्स असोसिएशनतर्फे दररोज सराफा बाजार दर जाहीर केला जातो. शुक्रवारी दुपारी १२ वाजता जारी झालेल्या दरानुसार सोने ५४८ रुपयांनी घसरून ६१०३७ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी २४३१ रुपयांनी घसरून ७२३५४ रुपये प्रति किलो झाली. याआधी गुरुवारी चांदीचा भाव 74795 रुपये आणि सोन्याचा भाव 61585 रुपयांवर बंद झाला होता. दोन दिवसांत चांदीत प्रतिकिलो ३००० रुपयांची घसरण झाली.

सोने आणि चांदी दोन्हीच्या दरांमध्ये घसरण
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. दुपारपर्यंत चांदीच्या दरात 537 रुपयांची घसरण झाली असून ती 73271 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे. याशिवाय सोन्याचा भाव 95 रुपयांच्या घसरणीसह 60797 रुपयांवर व्यवहार करताना दिसला. याआधी बुधवारी सोने 60892 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 73808 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today Updates check details on 12 May 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x