
Gold Price Today | महिनाभरापूर्वी प्रचंड तेजीसह विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या सोन्या-चांदीला आता घसरणीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या महिनाभरापासून सोनं-चांदीच्या दारांमध्ये घसरण होत आहे. 5 मे रोजी सोने आणि चांदीने विक्रमी उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 61739 रुपये आणि चांदी 77280 रुपये प्रति किलोग्राम वर बंद झाली होती.
सोनं 2,000 रुपयांनी खाली घसरले
आज पुन्हा मंगळवारी सोन्या-चांदीत घसरण पाहायला मिळत आहे. याचा प्रत्यय सर्वच सराफा बाजारात पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजच्या (एमसीएक्स) किंमतीत मात्र वाढ झाली आहे.
दिवाळीत सोन्याचे दर खूप वाढणार
मे महिन्यापासून च्या दरातील फरक पाहिला तर सोने 2000 रुपयांपेक्षा जास्त आणि चांदी विक्रमी पातळीवरून 5000 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोने आणि चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. जाणकारांच्या मते दिवाळीत सोन्याचे दर ६५,००० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचे दर ८०,००० रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण
सराफा बाजारात दररोज दुपारी १२ वाजता https://ibjarates.com मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 46,450 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. चांदी तब्बल ३०० रुपयांनी तर सोन्यात सुमारे १५० रुपयांची घसरण झाली आहे. याआधी सोमवारी सोने 59,921 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 73,432 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.
एमसीएक्सवर सोने-चांदीच्या दरात वाढ
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून आली. एमसीएक्सवर सोने 141 रुपयांनी वधारून 59782 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 533 रुपयांनी वाढून 73507 रुपये प्रति किलो झाली. याआधी सोमवारी एमसीएक्सवर सोने 59641 रुपये आणि चांदी 72974 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.
तुमच्या शहरातील आजचे नवे दर
* औरंगाबाद, २२ कॅरेट सोने : ५५४०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०४५० रुपये
* भिवंडी, २२ कॅरेट सोने : ५५४३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०४८० रुपये
* कोल्हापूर, २२ कॅरेट सोने : ५५४०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०४५० रुपये
* लातूर, 22 कॅरेट सोने : 55430 रुपये, 24 कॅरेट सोने : 60480 रुपये
* मुंबई, 22 कॅरेट सोने : 55400 रुपये, 24 कॅरेट सोने : 60450 रुपये
* नागपूर, २२ कॅरेट सोने : ५५४०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०४५० रुपये
* नाशिक, २२ कॅरेट सोने : ५५४३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०४८० रुपये
* पुणे, 22 कॅरेट सोने : 55400 रुपये, 24 कॅरेट सोने : 60450 रुपये
* सोलापूर, २२ कॅरेट सोने : ५५४०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०४५० रुपये
* वसई-विरार, २२ कॅरेट सोने : ५५४३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०४८० रुपये
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.





























