22 January 2025 6:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN
x

Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव रेकॉर्डब्रेक कोसळले, पटापट तपासून घ्या आजचे घसरलेले नवे दर

Gold Price Today

Gold Price Today | जर तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. आज तुम्हाला सोनं 2300 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. आज सोन्याचा भाव 56,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय चांदीचा भाव आज 63500 रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे.

2300 रुपयांनी स्वस्त मिळत आहे सोनं
आयबीजेएच्या वेबसाइटनुसार, 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याचा भाव विक्रमी पातळीवर होता. या दिवशी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 58,882 रुपयांवर पोहोचला होता. तर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 56515 रुपये आहे. त्यानुसार सध्या सोनं 2367 रुपयांनी स्वस्त होत आहे.

एमसीएक्स गोल्ड प्राइस
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. आजच्या तेजीनंतर सोने 0.65 टक्क्यांच्या वाढीसह 56515 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

चांदी झाली महाग
याशिवाय चांदीच्या दरात ही वाढ होताना दिसत आहे. आज चांदीच्या दरात 1.03 टक्क्यांची वाढ पाहायला मिळत आहे. या वाढीनंतर चांदीचा भाव 63535 रुपये प्रति किलो झाला आहे.

सोने खरेदी करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा
जर तुम्हीही बाजारात सोनं खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅपचा ही वापर करू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय या अॅपच्या माध्यमातूनही तुम्ही तक्रार करू शकता.

आपल्या शहराची किंमत तपासा
तुम्ही तुमच्या घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, तुम्ही 8955664433 नंबरवर मिस्ड कॉल देऊनच किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुमचे मेसेज येतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 13 March 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x