18 November 2024 4:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Gold Price Today | अलर्ट! सोन्याचे भाव गगनभरारीच्या दिशेने, या कारणाने सोनं अत्यंत महाग होणार, नेमकं कारण?

Gold Price Today

Gold Price Today | मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याच्या भावाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदाच सोन्याचा भाव ₹59137 च्या पातळीवर पोहोचला. स्पॉट गोल्डबद्दल बोलायचे झाले तर ते 1964 डॉलरवर होते. एमसीएक्सचा सोन्याचा वायदा करार 57955.00 रुपये प्रति 10 ग्रॅमपासून सुरू झाला आणि 58525 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकी पातळीवर पोहोचण्यात यशस्वी झाला.

देशातील सराफा बाजाराची स्थिती :
राजधानी दिल्लीसराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 38,460 रुपयांवर पोहोचला आहे. मागील सत्रात सोन्याचा भाव 57,640 रुपये प्रति 10 ग्राम वर बंद झाला होता. तर चांदी 430 रुपयांनी घसरून 67,600 रुपये प्रति किलोग्राम झाली होती.

यापूर्वी सोन्याची उच्चांकी पातळी किती होती?
सोनं आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरापेक्षा 662 रुपयांनी स्वस्तात विकलं जात होतं. याआधी म्हणजे 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याने उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 58882 रुपये प्रति १० ग्राम पोहोचला होता. पण आता सोनं नव्या उच्चांकी पातळीवर जाईल आणि ते ६० हजाराचा टप्पा ओलांडेल असं तज्ज्ञ सांगत आहेत.

काय म्हणतात तज्ज्ञ :
शेअरखानचे फंडामेंटल करन्सी आणि कमोडिटीज अॅनालिस्ट तज्ज्ञांनी २१-२३ मार्चला होणाऱ्या फेडच्या बैठकीत अमेरिकन फेडरल रिझर्व्ह दरवाढ करणार नाही, असा अंदाज वर्तवला आहे. बँकिंग संकटामुळे फेड व्याजदरात वाढ करणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पहिल्या रिपब्लिक बँकेत ३० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या अमेरिकी बँका एकत्र आल्याने कर्जाची चिंता काहीशी कमी होत आहे. त्याचबरोबर क्रेडिट सुईसला स्विस नॅशनल बँकेकडून मदत मिळण्याची शक्यता आहे.

क्रेडिट सुईसच्या शेअरमध्ये पुन्हा घसरण
दरम्यान, शुक्रवारी क्रेडिट सुईसच्या शेअरमध्येही मोठी घसरण झाली. दोन दिवसांच्या तीव्र अस्थिरतेनंतर शुक्रवारी क्रेडिट सुईसच्या शेअरमध्ये ८ टक्क्यांची घसरण झाली. तर बुधवारी २४ टक्क्यांची घसरण झाली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 18 March 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x