15 January 2025 10:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. जर तुम्हीही अलीकडे सोने किंवा चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आजच्या दराने चांगला फायदा मिळू शकतो. ईदच्या आदल्या दिवशी सराफा बाजारासह मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोने-चांदीतही मोठी घसरण पाहायला मिळाली. मात्र येत्या काळात सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

दरवाढीने नवे विक्रम प्रस्थापित केले
फेब्रुवारी महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली होती. पण त्यानंतर दरवाढीने नवे विक्रम रचले. भविष्यात सोन्याचे दर 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचे दर 80,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाण्याची शक्यता आहे. गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात हलके बदल दिसून आआले होते. पण आज सराफा बाजारातही घसरण दिसून येत आहे.

आज सोन्या-चांदीच्या दरात किती बदल झाला?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 60446 रुपयांवर खुला झाला आहे. वमागील सत्रात तो भाव 60616 रुपये प्रति दहा ग्राम वर बंद झाला होता. त्यामुळे आज सोने 170 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडले आहे.

सध्या सोने 434 रुपये प्रति 10 ग्रॅम कमी दराने विकले जात आहे. सोन्याने 13 एप्रिल 2023 रोजी उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोनं 60880 रुपये प्रति १० ग्राम वर पोहोचलं होतं. तर चांदीचा भाव प्रति किलो 74763 रुपयांवर खुला झाला आहे. चांदीचा भाव आज 656 रुपये प्रति किलोच्या घसरणीसह खुला झाला आहे.

एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या दरात घसरण
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. एमसीएक्सवर शुक्रवारी सोने 495 रुपयांनी घसरून 60008 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 531 रुपयांनी घसरून 74970 रुपये प्रति किलो झाली. याआधी गुरुवारी सोने 60503 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 75501 रुपयांवर बंद झाली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today Updates check details on 21 April 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x