16 April 2025 7:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN
x

Gold Price Today | आज सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या हालचाली, लग्नसराईच्या हंगामात उच्चांकी स्तरापेक्षा आज किती रुपयांनी स्वस्त झालं?

Gold Price Today

Gold Price Today | मंगळवारी झालेल्या घसरणीनंतर बुधवारी पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून आली. जर तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर महागडे दर ऐकून तुम्हाला धक्का बसेल. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. यापूर्वी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोन्याचा भाव 60,000 रुपयांच्या पुढे गेला होता. एमसीएक्सवर बुधवारी सोने आणि चांदीमध्ये संमिश्र ट्रेंड दिसून आला. दुसरीकडे सराफा बाजारातही दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात वाढ झाली आहे.

दोन महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ
गेल्या दोन महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. फेब्रुवारी महिन्यात सोने ५५ हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचले होते. पण त्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याच्या तेजीबरोबरच चांदीतही वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. काही महिन्यांत चांदी ८० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे.

सोन्याचा दर आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा किती खाली आहेत?
सोनं आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरापेक्षा 449 रुपयांनी स्वस्तात विकलं जात आहे. याआधी 13 एप्रिल 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा दर 60880 रुपये प्रति १० ग्राम वर पोहोचला होता. तर चांदीही 1669 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली ट्रेड करत आहे. चांदीने 13 एप्रिल 2023 रोजी 75869 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

आज सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर किती
इंडिया बुलियन्स असोसिएशनकडून सराफा बाजाराचे दर दररोज जाहीर केले जातात. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 300 रुपयांनी वाढून 60434 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. बुधवारी चांदीच्या दरातही वाढ झाली आणि ती 74315 रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहोचली. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 55358 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60434 रुपये आहे.

एमसीएक्सवर बुधवारी सोन्या-चांदीचे दर किती
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात संमिश्र तेजी दिसून आली. बुधवार दुपारी सोन्याचे दर 21 रुपयांनी घसरून 60240 रुपये प्रति 10 ग्राम आणि चांदी 230 रुपयांनी घसरून 74493 रुपये प्रति किलोग्राम झाला आहे. याआधी मंगळवारी सोने 60261 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 74263 रुपयांवर बंद झाली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today Updates check details on 26 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या