16 April 2025 10:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Gold Rate | दशकांप्रमाणे बदलत गेले सोन्याचे भाव, 99 रुपये प्रति तोळ्यावरुन 70 हजार पार, पुढे किती महागणार - Marathi News

Gold Rate Price

Gold Rate | भारताचा प्रत्येक नागरिक सोन्यामध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे आणि सुरक्षिततेचे मानतो. कारण की सोनं तुम्हाला गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देते. मागील दोन दशकांपासून सोन्याचे भाव चांगलेच वाढीस लागले आहेत.

मागील दोन दशकांतील सोन्याच्या स्तरानुसार 5,000 रुपये तोळापासून 78,000 हजार रुपये तोळा झालं आहे. तुम्हाला सोन्याचा आत्ताचा भाव तुमच्या वेतनाप्रमाणे किंवा तुमच्या जनरेशन प्रमाणे योग्य वाटत असेल. परंतु हाच सोन्याचा भाव एकेकाळी केवळ 99 रुपये तोळा असायचा. 99 रुपये तोळ हा सोन्याचा भाव तुमच्या आज्या-पंजोबाच्या काळातील रेट आहे. चला तर पाहूया मागील सात दशकांतील सोन्याचे भाव किती रुपयांनी होते.

एकूण 70 वर्षांत सोन्याचे भाव चांगलेच वाढीस लागले :
साल 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशातून सोन्याचे भाव झपाट्याने वाढू लागले. त्या काळानंतर आतापर्यंत सोन्याचे भाव खाली पडल्याची एकही बातमी किंवा माहिती समोर आली नाही. केवळ 1952, 1953 आणि 1954 मध्ये सोन्याचा भाव आपटला होता. यामध्ये 1953 साली दहा ग्राम सोनं 73 रुपयांनी विकले जात असायचे. म्हणजेच 70 वर्षांमध्ये सोन्याने 750% जास्तीचे रिटर्न मिळवून दिले आहे.

कधी विकलं गेलं 99 रुपयांनी सोन :
फायनान्शिअल एक्स्पर्टच्या रिपोर्टनुसार 99 रुपये सोनं कधी होतं त्याची माहिती मिळाली आहे. साल 1950 मध्ये 10 ग्राम सोन्याची किंमत 99 रुपये एवढी होती. हीच किंमत सध्याच्या घडीला म्हणजेच 2024 मध्ये 76,000 रुपये झाली आहे. समजा तुमच्या वडिलांच्या वडिलांनी 1950 साली सोन्यामध्ये 1,000 रुपयांची गुंतवणूक केली असेल तर, सध्याच्या घडीलाही किंमत 7.5 लाख रुपये एवढी आहे.

एकूण 7 दशकांतील सोन्याचे भाव लक्षात घ्या :
साल 1950 मध्ये 99 रुपये प्रति दहा ग्राम सोनं होतं. त्यानंतर 1960 मध्ये 111 रुपये, 1970 मध्ये 184 रुपये, 1980 मध्ये 1330 रुपये, 1990 मध्ये 3200, साल 2000 मध्ये 4400 रुपये, 2010 मध्ये एक लाख 85 हजार रूपये आणि 2020 मध्ये 48651 रुपये. तर, अशा पद्धतीने मागील सात दशकांपासून सोन्याचे भाव वाढत आले आहेत.

प्रत्येक वर्षी सोन्याच्या दराचे चांगले रिटर्न मिळते :
चक्रवाढ वार्षिक वृद्धी दरानुसार 1950 ते 2023 पर्यंत (CAGR) ने 9.18% रिटर्न मिळवून दिलं आहे. त्याचबरोबर 1960 ते 2023 पर्यंत 10.51% रिटर्न मिळवून दिलं आहे. सदस्या घडीला सोन्याचा भाव 77,000 या रेटने सुरू आहे. दरम्यान कोरोना काळात सोन्याची घसरण झाली होती. परंतु कोरोना काय संपल्यानंतर सोन्याचे भाव जास्तीत जास्त वाढीस लागले आहेत. ज्यामध्ये 48,000 किमतीने वाढून 78,000 हजारो रुपये एवढा दर वाढला आहे.

Latest Marathi News | Gold Rate Price 10 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gold Rate Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या