18 November 2024 1:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC
x

Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव क्षणात इतका वाढला, तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | आज धनतेरस आहे. या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. पण आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. दुपारी 12 वाजता सोन्या-चांदीचे ताजे दर येथे आहेत.

आज सराफा बाजारात सोने-चांदीचे दर किती?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 60445 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी सोने 60097 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ३४८ रुपयांनी महाग झाला आहे.

आज सोन्याचा भाव उच्चांकी पातळीपेक्षा किती स्वस्त?
सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 1140 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेला होता.

आज चांदीचा भाव
आज चांदीचा भाव प्रति किलो 70850 रुपयांवर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 70300 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. त्यामुळे चांदीचा भाव आज प्रति किलो ५५० रुपयांनी वधारला आहे. चांदी 5614 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

आज एमसीएक्सवर कोणत्या दराने सोन्याचा व्यवहार?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) दुपारी १२ वाजता सोन्याच्या दरात घसरण झाली. सोन्याचा वायदा व्यापार 166.00 रुपयांच्या घसरणीसह 60,116.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा वायदा व्यापार 267.00 रुपयांनी घसरून 70,946.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

आज कोणत्या कॅरेट सोन्याचा दर किती?

आज 14 कॅरेट सोन्याचा भाव
आज 14 कॅरेट म्हणजेच 58.3 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 45334 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज हा दर २६१ रुपयांनी वाढला आहे.

आज 18 कॅरेट सोन्याचा भाव
आज 18 कॅरेट म्हणजेच 75.0 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 55368 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज हा दर ३१९ रुपयांनी वाढला आहे.

आज 22 कॅरेट सोन्याचा भाव
आज 22 कॅरेट म्हणजेच 91.7 टक्के शुद्ध सोन्याचा दर 60203 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज हा दर ३४७ रुपयांनी वाढला आहे.

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव
आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कालच्या तुलनेत आज दरात ३४८ रुपयांची वाढ झाली आहे.

Disclaimer : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Update check details on 10 November 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x