23 January 2025 4:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचे भाव गगनाला भिडले, एकदिवसात सोन्याचे दर तब्बल इतक्या रुपयांनी वाढले

Gold Rate Today

Gold Rate Today | आज लग्नसराईच्या दिवसात सोनं खरेदी करणाऱ्यांना घाम फोडणारी बातमी समोर आली आहे. आज या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील एमसीएक्स आणि सोने-चांदीचे दर करमुक्त असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे. आज दर एकदिवसात प्रचंड वाढला असून पुढे देखील वाढू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येतं आहे.

आज सोन्याचा भाव किती झाला?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 62454 रुपये होता. तर आदल्या दिवशी सोने 61201 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. त्यामुळे सोन्याचा भाव आज प्रति दहा ग्रॅम 1253 रुपयांनी वधारला आहे.

आज सोन्याचा भाव उच्चांकी पातळीपेक्षा किती स्वस्त?
सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा सुमारे 827 रुपये प्रति 10 ग्रॅम ने स्वस्त आहे. 4 डिसेंबर 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्या दिवशी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 63281 रुपयांवर गेला होता.

आज चांदीचा दर
आज चांदीचा दर 73694 रुपये प्रति किलो आहे. त्याआधीच्या दिवशी चांदी ७०,८९८ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे चांदीचा दर आज 2796 रुपये प्रति किलोने वधारला आहे. चांदी 3240 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 30 नोव्हेंबर 2023 रोजी चांदीने 76934 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

एमसीएक्सवर कोणत्या दराने सोन्याचा व्यवहार?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) दुपारी १२ वाजता सोने तेजीसह व्यवहार करत आहे. आज सोन्याचा वायदा व्यापार 1381.00 रुपयांच्या वाढीसह 62,580.00 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा वायदा व्यापार 3079.00 रुपयांच्या वाढीसह 74,611.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

आज कोणत्या कॅरेट सोन्याचा दर किती आहे?

आज 10 कॅरेट सोन्याचा दर किती?
10 कॅरेट म्हणजेच 41.7 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 36536 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर ७३३ रुपयांनी वाढला आहे.

आज 14 कॅरेट सोन्याचा दर किती?
14 कॅरेट म्हणजेच 58.3 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 46841 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर ९४० रुपयांनी वाढला आहे.

आज 18 कॅरेट सोन्याचा दर किती?
18 कॅरेट म्हणजेच 75.0 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 57208 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर ११४८ रुपयांनी वाढला आहे.

आज 22 कॅरेट सोन्याचा दर किती?
22 कॅरेट म्हणजेच 91.7 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 62204 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर १२४८ रुपयांनी वाढला आहे.

आज 24 कॅरेट सोन्याचा दर किती?
24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 62454 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर १२५३ रुपयांनी वाढला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates Check Details 14 December 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(319)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x