21 April 2025 11:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | वेगाने धावणार टाटा मोटर्स शेअर्स, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS GTL Share Price | या बातमीचा जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकवर परिणाम होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: GTLINFRA NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर मालामाल करणार, BUY रेटिंग, पुढची टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा चिल्लर प्राईस पेनी स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 627% परतावा दिला - NSE: RTNPOWER IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचे भाव कुठे पोहोचले बघा, तुमच्या शहरातील आजचे 10 ग्रॅम सोन्याचे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली असली तरी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीत संमिश्र कल दिसून आला. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोने आणि चांदी दोन्हीमध्ये घसरण दिसून आली. मागील सत्रात सोने 58,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 68,000 रुपयांवर बंद झाली होती. (Gold Price Today)

आज एमसीएक्सवर सोन्याचा दर किती

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात घसरण दिसून आली. दुपारी सोने 102 रुपयांनी घसरून 59425 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 320 रुपयांनी घसरून 72158 रुपये प्रति किलो ग्रॅम झाली. याआधी शुक्रवारी एमसीएक्सवर सोने 59527 रुपये आणि चांदी 72478 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

सराफा बाजारात संमिश्र कल

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनकडून (आयबीजेए) सराफा बाजाराचे दर जाहीर केले जातात. आयबीजीएने (आयबीजेए) https://ibjarates.com केलेल्या वेबसाइटवर सोमवारी दुपारी जाहीर केलेल्या दरानुसार सोन्या-चांदीत घसरण झाली. सोमवारी सोने सुमारे 50 रुपयांनी वधारून 59345 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 75 रुपयांनी वाढून 71925 रुपये प्रति किलो ग्रॅम झाली.

याआधी सोन्याचा भाव 59294 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 72000 रुपये प्रति किलो होता. सोमवारी 23 कॅरेट सोन्याचा भाव 59108 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54360 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

सोनं उच्चांकी पातळीपेक्षा 2,240 रुपयांनी स्वस्त

सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 2,240 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त विकलं जातंय. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते. तर चांदीचा भाव 71,925 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 72,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीच्या दरात प्रति किलो ७५ रुपयांची घसरण झाली आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 07 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(325)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या