
Gold Rate Today | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. या आठवड्याची सुरुवात सोन्याच्या दरात वाढ होऊन झाली आहे. यापूर्वी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 58,700 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा भाव 73,500 रुपयांच्या आसपास आहे. चला तर मग जाणून घेऊया आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय आहे. (Gold Price Today)
एमसीएक्सवर सोन्याची किंमत काय आहे?
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 0.18 टक्क्यांनी वाढून 58745 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदीचा भाव 0.01 टक्क्यांनी वाढून 73,555 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
आज सराफा बाजारात सोन्याचा दर
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 58730 रुपयांवर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 58720 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोने प्रति दहा ग्रॅम १० रुपयांनी वधारले आहे.
आज सोन्याचा भाव उच्चांकी पातळीपासून किती स्वस्त?
सध्या सोन्याचा भाव 2,855 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते. तर चांदीचा भाव 73691 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 73695 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे चांदीच्या दरात आज प्रति किलो चार रुपयांची घसरण झाली आहे.
सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ
ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसांत झालेल्या घसरणीनंतर आता सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सोन्याचा भाव आता पुन्हा 58,000 ते 59,000 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. याशिवाय चांदीच्या दरातही वाढ पाहायला मिळत आहे.
आपल्या शहराची किंमत तपासा
तुम्ही घरबसल्या सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, तुम्ही फक्त 8955664433 नंबरवर मिस्ड कॉल देऊन किंमत तपासू शकता. ज्या नंबरवरून तुम्ही मेसेज कराल त्याच नंबरवर तुमचा मेसेज येईल.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.





























